फक्त लसच नाही, तर ‘या’बाबतीत पण केंद्राने केला दुजाभाव; चव्हाणांनी आकडेवारी दाखवत केली पोलखोल
राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहे. तसेच राज्यात कोरोना लसीकरणालाही सुरुवात झाली आहे, पण सध्या लसीवरुनही राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लस देण्याबाबत भेदभाव केला जात आहे, असल्याचे सत्ताधारी नेत्यांकडून बोलले जात आहे. आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राने दुजाभाव केल्याबाबतची आकडेवारी सादर केली आहे.
केवळ लस पुरवठ्याबाबतच नाही, तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यात सुद्धा केंद्राने महाराष्ट्राशी दुजाभाव केला आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. लोकसभेत सादर करण्यात आलेली अधिकृत आकडेवारीच चव्हाणांनी सादर केली आहे.
या आकडेवारीनुसार, गुजरातला दर हजार कोरोना रुग्णामागे ९६२३ एन-९५ मास्क देण्यात आले आहे. तर महाराष्ट्राला केवळ १५६० च मास्क देण्यात आले आहे. इतकेच नाही तर उत्तर प्रदेशला महाराष्ट्राच्या दुप्पटीने मास्क देण्यात आले आहे. तसेच गुजरातला हजार रुग्णांमागे ४९५१ पीपीई कीट देण्यात आल्या आहे, तर महाराष्ट्राला फक्त २२३ पीपीई किट मिळाल्या आहे.
तसेच व्हेंटिलेटरची आकडेवारीही धक्कादायक आहे. गुजरातला दर हजार रुग्णांमागे १३ व्हेंटीलेर्स देण्यात आले आहे, तर महाराष्ट्राला हजार रुग्णांमागे फक्त २ व्हेंटीलेटर्स देण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी असतानाही वैद्यकीय उपकरणांच्या बाबतीत गुजरातला भरभरुण देण्यात आले आहे, अशी टिकाही पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
फक्त लसच नाही, तर ‘या’बाबतीत पण केंद्राने केला दुजाभाव; चव्हाणांनी आकडेवारी दाखवत केली पोलखोल
मोठा खुलासा, प्रदीप शर्माने सचिन वाझेला पोलीस सेवेत घेण्यासाठी घेतली होती भाजप मंत्र्याची भेट
सरकारच्या डोक्यावर कर्ज झाले तरी चालेल पण व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करा – फडणवीसांची मागणी
0 Comments: