Deepali chavan suicide : दीपाली चव्हाण यांची ४ पानांची सुसाइड नोट सापडली; काय चाललं होतं त्यांच्या आयुष्यात?

March 26, 2021 0 Comments

जयंत सोनोने/ : जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ (Deepali chavan suicide) यांनी गुरुवारी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांच्या नावाने लिहिलेल्या चार पानांची सुसाइड नोट सापडली. त्यातून उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आत्महत्येस जबाबदार असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये नमूद केल्याने धारणी पोलिसांनी शिवकुमार विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. दीपाली चव्हाण या २०१४ रोजी वन विभागात रुजू झाल्या. त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून धुळघट रेल्वे येथे पहिली पोस्टिंग मिळाली होती. २०१९ मध्ये त्यांची हरीसालला बदली झाली. हरिसाल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांच्या पुनर्वसनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र, त्यांच्याकडे वनपाल, वनमजूर असा पुरेसा कर्मचारी वर्ग नसताना त्यांनी मांगीय गावचे पुनर्वसन केले. या दरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी याबाबत विनोद शिवकुमार यांना माहिती दिली. मात्र तू खोटी बोलते, असे म्हणत त्यांनी दीपाली यांची मदत केली नाही. आदिवासी बांधवांच्या तक्रारीवरून दीपाली चव्हाण यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यावेळी 'असेच पाहिजे, जा कारागृहात' असे शिवकुमार यांनी म्हटले होते. यासह शिवकुमार हे रात्रीला गस्ती दरम्यान कुठेही बोलवून असभ्य भाषा वापरायचे. कॅम्पवर बोलवायचे. माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न शिवकुमार करीत होते. त्यांच्या मर्जीने वागले नसल्याने ते हरीसालला आल्यावर कर्माचाऱ्यांसमोर अपमानित करायचे. शिवकुमार यांच्या मर्जीने वागत नसल्याने माझे वेतन रोखण्यात आले, मानसिक छळ केला जात होता. गर्भवती असताना त्यांनी मला अमरावतीला सासरी जाऊ देण्याची परवानगीही नाकारली होती. गर्भवती असतानाही विनोद शिवकुमार यांनी जबरदस्तीने पहाडी भागात गस्तीला पाठवले. यामुळे त्रास झाला आणि गर्भपात झाला, अशी व्यथा दीपाली चव्हाण यांनी नोटमधून मांडली. शिवकुमार यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल मी खासदार नवनीत राणा यांच्याकडे सुद्धा तक्रार केली होती, असे दिपाली चव्हाण यांनी नोटमध्ये म्हटले आहे. शिवकुमार यांना अटक वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अमरावती पोलीसांनी आज नागपुरातून अटक केली. दक्षिणेतील कर्नाटक या त्यांच्या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवकुमार नागपूर रेल्वे स्थानकातून कर्नाटककडे जाणार्‍या एक्स्प्रेसमध्ये बसत होते, त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: