संजय राऊत बाहेरचे; काँग्रेस खासदाराचा बोचरा टोला

March 26, 2021 0 Comments

मुंबई: संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार व काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता काँग्रेसचे खासदार यांनी संजय राऊतांना टोला हाणला आहे. ( Taunts Rajit Satav) वाचा: यूपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करायला हवं, असं मत संजय राऊत यांनी वारंवार व्यक्त केलं आहे. संधी मिळाली की ते याबद्दल बोलत असतात. अलीकडंच त्यांनी पुन्हा एकदा हे मत मांडलं. खुद्द काँग्रेसमधील अनेक नेत्यांनाही तसंच वाटतं, असा दावाही त्यांनी केला होता. त्यावरून काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. नाना पटोले यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, असा खोचक प्रश्न पटोले यांनी केला होता. त्यानंतर खासदार राजीव सातव यांनीही राऊत यांना टोला हाणला आहे. वाचा: पटोले यांच्या या टीकेला राऊत यांनी आज उत्तर दिलं होतं. 'यूपीएचा अध्यक्ष हा राष्ट्रीय विषय आहे. राज्यातील व जिल्हा स्तरावरील नेत्यांनी त्यावर बोलण्याची गरज नाही. मजबूत विरोधी पक्षाच्या दृष्टीनं व व्यापक देशहिताच्या दृष्टीनं आम्ही हे मत मांडलं आहे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर खासदार सातव यांनी ट्वीट केलं आहे. 'सध्या महाराष्ट्रात काही नाजूक प्रश्न आहेत. काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. बाकी, यूपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी यूपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ,' असा चिमटा सातव यांनी काढला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: