पुण्यात रुग्णसंख्या वाढतेय; पण 'हा' दिलासा कायम

March 07, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, शहरात नव्या करोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी त्या तुलनेत मृत्युदर नियंत्रणात असल्याचे गेल्या दहा दिवसांतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गंभीर रुग्णांपेक्षा लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या, तातडीने निदान आणि योग्य उपचारांमुळे शहरातील मृत्युदर नियंत्रणात असल्याचे निरीक्षण आरोग्य तज्ज्ञांनी नोंदविले आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्येसोबत मृतांची संख्याही वेगाने वाढत होती. जून ते सप्टेंबर महिन्यांत अनेकदा मृत्यूसंख्या दोन आकडी होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर मृत्युदरही घटला होता. आता गेल्या महिनाभरापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी शहरात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दहाच्या खाली असल्याचे दिसत आहे. याबाबत माहिती देताना महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, 'करोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत आता कमी आहे. कारण सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असली, तरी त्यामध्ये लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अशा प्रकाराचे सुमारे पाच हजार रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत. उर्वरित चौदाशे रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. गंभीर रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांच्या पद्धतीही आता निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना तातडीने आणि वेळेवर उपचार मिळत असल्याने मृत्युदर नियंत्रणात आहे.' अनेकदा विषाणूमध्ये विविध बदल (व्हेरिएशन) होत असल्यामुळे विषाणूच्या प्रसाराची क्षमता वाढते. त्यामुळे होणाऱ्या आजाराची क्षमता कमी होते, असे आढळले आहे. त्यामुळे करोना विषाणूचा नव्याने 'जिनोम सिक्वेन्स'चा अभ्यास झाल्यास मृत्युदर कमी होण्यामागचे कारण अधिक स्पष्टपणे कळेल. याशिवाय गेल्या वर्षभरापासून करोनारुग्णांवर उपचार करीत असल्याने डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढला आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करताना कोणती औषधे वापरायची, याविषयीचे अनेक अभ्यास प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर योग्य उपचार मिळत आहेत. त्यामुळेही मृत्युदर कमी असल्याचे दिसून येते. - डॉ. महेश लाखे, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ दिनांक नवीन रुग्ण सक्रिय रुग्ण मृत्यू २५ फेब्रुवारी ७४३ ३९३० ७ (३ शहराबाहेरील) २६ फेब्रुवारी ७२७ ४२५३ ८ (२ शहराबाहेरील) २७ फेब्रुवारी ७३९ ४५७४ ९ (३ शहराबाहेरील) २८ फेब्रुवारी ७७४ ४९१९ ४ (२ शहराबाहेरील) १ मार्च ४०६ ४९०६ ६ (२ शहराबाहेरील) २ मार्च ६८८ ५०९१ ६ (१ शहराबाहेरील) ३ मार्च ८५३ ५५५१ ७ (२ शहराबाहेरील) ४ मार्च ९०४ ५८८६ ९ (२ शहराबाहेरील) ५ मार्च ८३० ६१६० ९ (४ शहराबाहेरील) ६ मार्च ९६३ ६४६० ९ (५ शहराबाहेरील)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: