मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी गृहखात्याचे काम संथ; काँग्रेसचा आरोप

March 07, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई खासदार यांच्या आत्महत्येविषयी राज्याचे वेगाने काम करत नसल्याचे पक्षातील अनेक धुरिणांचे म्हणणे आहे. एकीकडे भाजपकडून विविध प्रकारे सरकारवर हल्लाबोल सुरू असताना डेलकर यांच्या आत्महत्येच्या पत्रात बड्या हस्तींची नावे असूनही त्याबाबत गृहखाते मौन बाळगून असल्याबाबत काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर वाढत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ भेटायला जाणार असल्याचे एका वरिष्ठ काँग्रेस मंत्र्याने 'मटा'ला सांगितले. पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूनंतर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणात भाजप नेत्यांनी राज्यभरात जोरदार निदर्शने केली, तसेच प्रचार केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. दुसरीकडे आता मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटीलियाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटिनच्या काड्यांच्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मनसुख हिरेन यांनीही आत्महत्या केली असून, हे प्रकरण 'एनआयए'कडे द्यावे, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली आहे. या प्रकरणावरूनही राज्यात भाजप राजकीय वातावरण पेटवणार असल्याचे दिसत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर राज्यात सरकार असूनही व अनेक प्रकरणे हाताशी असूनही राज्याचे गृहखाते मात्र घेत असलेली संथ भूमिका आश्चर्यकारक असल्याचे काँग्रेसमधील सगळ्याच ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आवाज उठवणार डेलकर यांनी केवळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारच त्यांना न्याय देऊ शकत असल्यानेच मुंबईत येऊन आत्महत्या करत असल्याचे आपल्या पत्रात नमूद केले आहे, असे बोलले जाते. असे असताना त्यांना न्याय देण्यासाठी नक्की कोणती पावले उचलली गेली, पोलिस नक्की काय करत आहेत, या प्रकरणी कोणाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे का, असल्यास त्यात नक्की कोणती चौकशी सुरू आहे, हे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आपल्याला समजायला हवे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत तरी हा विषय जोरदारपणे उठवायचा किंवा याबाबत थेट उद्धव ठाकरे यांचीच सर्व प्रमुख काँग्रेस नेत्यांनी भेट घेऊन आपले म्हणणे मांडायचे, असे ठरत असल्याचे काँग्रेस पक्षातील वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: