चेंबूर, देवनार, गोवंडीची पाण्याची चिंता मिटणार; 'हे' आहे कारण

March 07, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महापालिकेतर्फे चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे भूमिगत बांधण्यात येणार आहे. या बोगद्यामुळे देवनार, गोवंडी, मानखुर्द आणि चेंबूर विभागातील पुढील ४० वर्षांची पाण्याची चिंता मिटणार आहे. या विभागाच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या जलबोगद्याचा शुभारंभ पर्यटनमंत्री यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२४ पर्यंत सुरू होईल. पालिकेच्या भूमिगत जलबोगदे प्रकल्पात अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तर जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगद्याचे खोदकाम करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत चेंबूर येथील हेडगेवार उद्यान, आरसीएफ आणि अणुशक्ती नगर येथे सुमारे ८१ मीटर ते ११० मीटर इतक्या खोलीची तीन कुपके बांधण्यात येत आहेत. या जलबोगद्याच्या बांधकामाचा कालावधी ७२ महिन्यांचा आहे. प्रकल्प सल्लागार मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लि.आणि मे. पटेल इंजिनीअरिंग आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या अमर महल ते प्रतिक्षा नगर आणि पुढे परळपर्यंतच्या जलबोगद्याच्या बांधकाम प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रकल्पांतर्गत हेडगेवार उद्यान, प्रतीक्षा नगर आणि परळ येथे सुमारे १०१ ते १०९ मी. खोलीची तीन कुपके बांधण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या दोन कुपकांचे खोदकाम पूर्ण झाले असून परळ येथील कुपकाचे खोदकाम प्रगतिपथावर आहे. या जलबोगद्यामुळे मुंबई शहरातील परळ एफ/दक्षिण व माटुंगा एफ /उत्तर तसेच अंशतः कुर्ला एल व भायखळा ई विभागांच्या पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा होणार असून या चेंबूर, गोवंडी प्रमाणे या विभागातही २०६१ पर्यंतचा वाढीव करण्यास हे जलबोगदे फायदेशीर ठरणार आहेत. या पाहणीसाठी महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेता विशाखा राऊत, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, मुख्य अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) शि. बा. उचगावकर उपस्थित होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: