मुंबईतील 'या' भागांत करोना संसर्गाचा धोका वाढला

March 07, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई फेब्रुवारीपासून संसर्ग वाढत असून पश्चिम उपनगरांत रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने भर पडत आहे. शुक्रवारी बोरीवली, अंधेरी पश्चिम, कांदिवली, मालाड, अंधेरी पूर्वमध्ये उपाचाराधीन करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळली आहे. दिवसभरात बोरीवलीत ७५३ रुग्ण आढळले तर अंधेरी पश्चिमेस ७१६, कांदिवलीत ६४४, मालाडमध्ये ६३४, अंधेरी पूर्वेस ६३१ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्णदुपटीचा कालावधीही कमी होत चालला आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात १,१८८ नवीन रुग्ण आढळले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,२५३ आहे. शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३३२,२०४ असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३,०९,४३१ आहे. तर उपचाराधीन रुग्णसंख्या १०,३९८ आहे. करोनाच्या एकूण चाचण्यांची संख्या ३३,९३,३९२ अशी झाली आहे. गेल्या काही महिन्यात मुंबईतील करोना संख्येत उतार येत गेला तरी फेब्रुवारीपासून त्यात वाढ होत गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने नव्याने कडक नियम लागू केले आहेत. तरीही गतवर्षीप्रमाणेच यंदाच्या मार्चमध्येही सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या पश्चिम उपनगरात आढळली आहे. सर्वात जास्त रुग्णसंख्येच्या यादीत पश्चिम उपनगराने आघाडी घेतली आहे. तर पूर्व उपनगरातील मुलुंड, घाटकोपर, माटुंगा आदी भागांतील रुग्ण संख्या पश्चिम उपनगराच्या तुलनेत कमी आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: