हिरेन मृत्यू : मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवा; महसूल मंत्री थोरात यांचे आवाहन

March 06, 2021 0 Comments

म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर ‘सरकार बदलत असते पण मुंबई तेच असतात. त्यांची कार्यपद्धती अतिशय चांगली आहे. राजकारणातून विरोधकांनी विरोध केला असला तरी पोलिसांवर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. मुंबईतील व्यापारी मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे (SIT) दिला आहे, तो योग्य पद्थतीनेच होणार, याच शंका घेण्याचे कारण नाही. पोलिसांवर आरोप करणे चुकीचे आहे,’ अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केली. ( revenue minister ) थोरात आज नगरमध्ये आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. थोरात म्हणाले, ‘हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास कोणाकडे कसा द्यायचा हा गृह विभागाला अधिकार आहे. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविला आहे. ही घटना का घडली, कशी घडली, यासंदर्भात तपास होत आहे. हा तपास करण्यास राज्याचे पोलिस दल सक्षम आहे. सरकार कोणाचेही असो, मुंबई पोलिस आपले काम करीत असतात. त्यांचा याबाबती लौकिक आहे. त्यांच्यावर सर्वांनीच विश्वास ठेवला पाहिजे. हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपासही योग्य पद्तीने होईल,’ असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. क्लिक करा आणि वाचा- नाशिक येथील मुद्रांक गैरप्रकारासंदर्भात विचारले असता थोरात म्हणाले की, ‘या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे. त्यातून काही गोष्टी पुढे आल्या असून त्यांची छानणी सुरू आहे. संबंधितांवर नक्कीच कारवाई होईल,’ असेही थोरात म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: