'शिवसेनेचा मुख्यमंत्री होताच सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत कसे?'
मुंबई: प्रकरणातील तपास अधिकारी यांच्याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले असतानाच, आज मनसेनं थेट शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावरच सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत रुजू कसे झाले?,' असा सवाल मनसेनं केला आहे. ( On And Shiv Sena Connection) वाचा: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मालकाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सचिन वाझे हे तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. मात्र, या प्रकरणातील घटनाक्रम सांगताना फडणवीस यांनी शुक्रवारी सचिन वाझे यांच्यावरच प्रश्न उपस्थित केले होते. वाझे यांनी लगेचच ते आरोप फेटाळले होते. मात्र, मनसेचे माजी नगरसेवक यांनी आता वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत रुजू करून घेण्याबदद्ल प्रश्न उपस्थित केला आहे. तसं ट्वीटही त्यांनी केलं आहे. वाचा: 'सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढलं आहे. सगळी महत्त्वाची प्रकरणं त्यांच्याकडंच का सोपवली जातात? तसंच, शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात,' अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली आहे. ख्वाजा युनुस प्रकरणात सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आलं होतं. शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं आहे. याच अनुषंगानं देशपांडे यांनी आपलं मत मांडलं आहे. 'एखाद्या अधिकाऱ्याचे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध असेल तर तो निष्पक्षपाती चौकशी करू शकेल का, असा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकतो. ख्वाजा युनुस प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. असं असतानाही वाझे यांना सेवेत पुन्हा कसं घेतलं?,' असा सवालही त्यांनी केला. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: