mansukh hiren: मनसुख हिरेन यांची आत्महत्या आहे की हत्या?; संजय राऊत म्हणाले...

March 06, 2021 0 Comments

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच, त्या कारचे मालक (Mansukh Hiren) यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदरच्या खाडीत आढळला. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस सांगत आहेत. हिरेन यांच्या कुटुबीयांनी हा दावा फेटाळून लावला आहे. या दरम्यान, शिवसेनेचे नेते, खासदार (Sanjay Raut) यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ( leader and mp gives reaction on ) ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायकही आहे आणि दुर्दैवी देखील आहे. ती आत्महत्या आहे की हत्या आहे, याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. ही शंका लवकरच दूर होणे गरजेचे आहे. उपस्थित केलेले मुद्दे योग्य, मुद्देसूद असतील, तसेच त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास होणे आवश्यक आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या मृत्यूचे भांडवल करणे चुकीचे आहे. याचे कारण म्हणजे ती व्यक्की निरपराध आहे. त्या व्यक्तीचा बळी कोणत्या कारणामुळे गेला?, यास कोण जबाबदार आहे?, याबाबतचे सत्य लवकरात लवकर समोर आणणे आवश्यक आहे. ते सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल, असेही राऊत पुढे म्हणाले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अशा वेळेस एका महत्वाच्या गुन्ह्यातील व्यक्ती किंवा साक्षीदाराचा मत्यू होणे हे नक्कीच धक्कादायक आहे. मात्र असे असले तरी देखील विरोधी पक्षाने तपास पूर्ण होईपर्यंत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अयोग्य आहे. त्यांच्या कुटुंबाचा, पत्नीचा आक्रोश मला व्यथित करणारा आहे, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही ते व्यथित करत असेल. त्यामुळे हे प्रकरण नक्की काय आहे हे बाहेर येणं गरजेचं आहे, असे राऊत यांनी सागितले. क्लिक करा आणि वाचा- विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास देण्याची मागणी केली आहे. मात्र असे केल्याने सत्य बाहेर येईल असे नाही. मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, असे राऊत म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास एटीएसकडे दिला आहे. त्यातील सर्व अधिकारी उत्तम असल्याचे ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- सचिन वाझे यांनी २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे संशय निर्माण झाला, असे राऊत यांना पत्रकारांनी प्रश्नही विचारला. त्यावर आपल्याला तसे वाटत नसल्याचे राऊत म्हणाले. मी त्याच्याविषयी फार बोलणं योग्य नाही. एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन असे बोलणे मला योग्य वाटत नसल्याचे ते पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: