करोना रुग्णांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक; 'या' कारणांमुळं होतोय संसर्ग

March 12, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई वाढत्या संसर्गात राज्यात ३१ ते ४० या वयोगटातील रुग्णसंख्येचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. या वयोगटातील ४ लाख ७२ हजार ७७६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल ४१ ते ५० या वयोगटामध्ये ४ लाख ५ हजार १०० रुग्ण नोंदवले आहेत. नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणाच्या निमित्ताने या वयोगटामध्ये घराबाहेर काम करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यात संसर्गाचे प्रमाणही अधिक दिसून येत आहे. ३१ ते ४० या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे २१ टक्के व्यक्तीमध्ये संसर्ग झाला आहे, तर त्याखालोखाल ४१ ते ५० या वयोगटामध्ये १७.९९ टक्के व्यक्ती असल्याचे दिसते. ५१ ते ६० या वयोगटातील १६.३४ टक्के जणांमध्ये ज्यात करोना संसर्गाची लागण झाली आहे तर ६१ ते ७० या वयातील ११.१९ टक्के व्यक्ती या संसर्गामुळे बाधित आहे. मार्च ते ऑगस्ट या कालावधीमध्ये चाळीशीच्या पुढील वयोगटामध्ये अधिक होते. उपचारासाठी रुग्णालयांत न जाणाऱ्या व्यक्तींमध्ये निदानासाठी उशीर झाल्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले होते. मात्र जून, जुलैमध्ये यात बदल झाला. आता पुन्हा ३१ ते ४० या वयोगटात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. राज्यात दहा वर्ष वयोगटातील ७४,२८४ इतके रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण ३.३० टक्के इतके आहे. तर ११ ते २० या वयोगटामधील १ लाख ४९ हजार ०९७ म्हणजे ६.६२, २१ ते ३० वयोगटातील ३ लाख ६९ हजार ५८५ म्हणजे १६.४१ टक्के तर ३१ ते ४० या वयोगटातील ४ लाख ७२ हजार ७६२ म्हणजे २१ टक्के व्यक्तींना करोना संसर्गाची लागण झाली आहे. तरुणांमध्ये संसर्ग अधिक दिसत आहे. त्यांच्याकडून हा संसर्ग कुटुंबातील अन्य सदस्यांना होण्याची शक्यता असते. त्यामुळेच ४१ ते ५० व ५१ ते ६० या वयोगटामध्ये संसर्गाचे प्रमाणही अधिक असू शकते. -डॉ. एम. एम.मयेकर, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ वयोगट - रुग्णसंख्या - टक्केवारी ३१ ते ४० - ४७२७६२ -२१ टक्के ४१ ते ५० - ४०५१०० - १७.९९ ५१ ते ६० - ३६८०१४ -१६.३४ ६१ ते ७० - २५२०६५ -११.१९ ७१ ते ८० - १२१७५५ - ५.४१ १०१- ११०- ३४ -०.०० एकूण - २२५१६९४ - १००


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: