चिंता वाढली! मुंबईत लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये वाढ
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पॉझिटिव्ह असलेल्या, मात्र लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांकडून संसर्ग अधिक प्रमाणात फैलावतो. मुंबईमध्ये लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. पालिकेच्या आरोग्य अहवालानुसार, मुंबईत करोना पॉझिटिव्ह असलेल्या मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण ६,८७८ इतके असून प्रकृती स्थिर असलेल्या मात्र लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण ४,१२८ इतके नोंदवण्यात आले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत निम्मे होते. आता मात्र त्यात बदल झाला आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण ६८७८ इतके असून लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ४,१२८ इतके नोंदवले आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये ३ लाख १३ हजार ३४६ रुग्ण बरे झाले आहेत व त्यांची टक्केवारी ९३ टक्के इतकी आहे. अत्यव्यस्थ रुग्णांचे प्रमाण हे ३७३ इतके नोंदवण्यात आले आहे. त्यांची टक्केवारी १ इतकी आहे. मृत्यू झालेल्या बाधितांचे प्रमाण ११ हजार ५११ इतके आहे. मुंबईमध्ये मृत्यूदर हा ३ टक्के इतका नोंदवला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येचे विभाग मुलुंड, अंधेरी, माटुंगा, वांद्रे, चेंबूर पूर्व आणि पश्चिम, भांडुप, खार, कुर्ला या भागांत रुग्णसंख्यावाढीचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे. यापैकी मुलुंडमध्ये सर्वाधिक म्हणजे रुग्णवाढीच्या दुपटीकरणाचा दर हा १३७ दिवसांचा आहे, तर अंधेरीमध्ये हा दर १४७ दिवस आहे. मांटुगा येथे १५९ तर वांद्रे येथे १६९ दिवसांचा रुग्णवाढ दुपटीकरणाचा वेग दिसून आला आहे. परळ, मरीन लाइन्स, एलफिंस्टन आणि दादर येथे रुग्ण दुपटीकरणाचा कालावधी हा अधिक आहे. परळमध्ये ३३८ ,मरीन ड्राइव्ह येथे ३१२ तर दादरमध्ये ३०३ दिवसांचा रुग्णदुपटीकरणाचा दर दिसून आला आहे. पूर्ण शहरामध्ये हा दर २०५ दिवसांचा आहे. उपाचाराधीन रुग्णसंख्या आर सी प्रभाग- ८१६, के पश्चिम- ७८३, आर एस प्रभाग- ७००, पी एन प्रभाग ६८८, के पश्चिम- ६८७, टी प्रभाग- ६११, एन प्रभाग ५७५.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: