मुंबईकरांचा लोकलप्रवास आता 'उत्तम' होणार; नेमकं काय घडलं?

March 12, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुसह्य होण्यासाठी 'उत्तम' प्रवासी सेवेत दाखल करण्यात आली आहे. या लोकलच्या आसनव्यवस्थेत प्रवाशांच्या मागणीनुसार अर्थात बसल्यावर पाठीला आधार मिळावा यासाठी आवश्यक बदल करण्यात आले आहेत. वातानुकूलित लोकलच्या धर्तीवर या लोकलमध्ये देखील साखळीऐवजी बटणाचा पर्याय देण्यात आला आहे. हे बटण दाबून आपत्कालीन वेळेत लोकल थांबवता येणे शक्य आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात प्रत्येकी एक-एक दाखल करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर ही लोकल धावत असून या लोकलच्या रोज १० ते १२ फेऱ्या होतात. या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चांगला अभिप्राय मिळत आहे. महिला डब्यात नव्याने करण्यात आलेल्या आसनव्यवस्था आरामदायी आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होईल, यादृष्टीने या लोकलची बांधणी करण्यात आलेली आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी या लोकलमध्ये प्रथम दर्जा महिलांसह पुरुष डब्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत. आसनव्यवस्थेत पाठीला आराम मिळेल, अशा पद्धतीने गादी असलेल्या आसनांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे शेकडो वर्षे लोकलची ओळख असलेली साखळी उत्तम लोकलमधून काढून त्याऐवजी बटणाची सुविधा देण्यात आली आहे. प्रवास सुसह्य होण्यासाठी हवा खेळती रहावी यासाठी अंतर्गत रचनेत बदलही केले आहेत. बॅगा ठेवण्यासाठी फायबरच्या रॅकची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अन्य लोकलच्या तुलनेत रॅकची लांबी कमी करण्यात आली आहे. यामुळे बॅगा ठेवण्यासाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: