जळगावात करोनाची वर्षपूर्ती; पण परिस्थिती अजूनही गंभीर

March 28, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: मागील वर्षी सुरु झालेल्या करोना संसर्गाचा वेग मध्यतंरीच्या अडीच महीन्यात थांबला होता. त्यानतंर पु्न्हा करोना संसर्ग झपाट्याने पसरायला लागला आहे. जळगाव जिल्ह्यात करोनाचा शिरकाव होवून आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागील वर्षी २८ मार्च रोजी जळगाव शहरातील मेहरुण परीसरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. या एका वर्षात जळगाव जिल्ह्यात तब्बल ८३ हजार १६५ जण करोनामुळे बाधित झालेत. यापैकी १५५४ रुग्णांचा करोनाने बळी गेला आहे. पहिला रुग्ण आढळून यायला एक वर्ष पूर्ण झाले असतांना जळगाव शहरासह जिल्ह्यात पु्न्हा करोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णालये फुल्ल झाली आहेत, तर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी देखील जागा मिळत नसल्याची भयावह परिस्थिती आज निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या २८ तारखेला करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. जळगाव शहरातील मेहरुण परिसरात असलेल्या एका ४९ वर्षीय रुग्णाचा करोना तपासणीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानतंर २ एप्रिल रोजी एका करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांचा रिपोर्ट त्याच्या मृत्यूनतंर प्राप्त झाला होता. त्यानतंर पहिला रुग्ण १५ दिवसांनी बरा होवून परत गेल्यानतंर अवघ्या तीन दिवसांनी अमळनेर तालुक्यातील एक महिला तिसरा करोना बाधित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल झाली. या काळात केंद्र शासनाने लाकडाऊन देखील सुरु केला होता. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोनाचा संसर्ग वाढायला लागला. या काळात करोनाचा संसर्ग जसजसा वाढत गेला तसा करोनाच्या बळींचा आकडाही वाढत गेला. तेव्हा जळगाव जिल्ह्यातील करोनाचा मृत्यूदर हा देशात सर्वाधिक म्हणजेच एकूण पॉझिटिव्हिटीच्या तुलनेत १३ टक्के इतका होता. सलग तीन महिने हीच परिस्थिती कायम होती. नंतर आरोग्य यंत्रणेच्यावतीने शर्थीचे प्रयत्न करून मृत्यूदर नियंत्रणात आला. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात करोना संसर्गाचा वेग मंदावला होता. त्यानंतंर पुन्हा फेब्रुवारी अखेरपासून पुन्हा करोना संसर्ग वाढू लागला. मार्च महीन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर संसर्गाचा उद्रेक होवून दररोज १२०० पर्यंत नविन रुग्ण आढळून यायला सुरुवात झाली आहे. सध्या परिस्थिती गंभीर जळगाव जिल्ह्यात करोना संसर्गाच्या तीव्रतेने सध्या विदारक चित्र निर्माण केले आहे. गेल्या दहा दिवसांत ११ हजारांवर नवे रुग्ण आढळून आले आहेत. सक्रिय रुग्णांसह ऑक्सिजन व आयसीयूतील गंभीर रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना बेडसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. वाढत्या गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचा जीव जात आहे. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दहा-बारापेक्षा अधिक मृत्यू होत आहेत. काल शुक्रवारी हा आकडा १५ पर्यंत पोहचला होता. गुरुवारी रात्री नेरीनाका स्मशानभूमीतील सर्व १२ ओट्यांसह खाली जमिनीवर सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत होते. त्याचवेळी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराबाहेर आणखीही मृतेदह अंत्यस्कारासाठी प्रतिक्षेत होते. वर्षभरातील करोना अपडेट जिल्ह्यात पहिला बाधित रूग्ण २८ मार्च २०२० करोनामुळे पहिला मृत्यू २ एप्रिल २०२० पहिला बाधित रूग्ण ११ एप्रिल २०२० करोनामुक्त सर्वाधिक २० मृत्यू ९ सप्टेंबर २०२० सर्वाधिक १२२३ बाधित रूग्ण २४ मार्च २०२१ सर्वाधिक ९९५ रूग्ण २५ मार्च २०२१ रोजी करोनामुक्त जिल्ह्यात एकूण ५ लाख ९७ हजार ६३८ संशयितांची करोना चाचणी जिल्ह्यात आतापर्यंत ८३१६५ व्यक्ती करोना बाधित जिल्ह्यात आतापर्यंत ७०८७७ रूग्णांची करोनावर मात जिल्ह्यात करोनामुळे आतापर्यंत १५५४ रूग्णांचा मृत्यू जिल्ह्यात आज १०७३४ बाधित रूग्णांवर उपचार सुरू जिल्ह्यात १ लाख ५ हजार ११७ नागरीकांना लसीचा पहिला डोस जिल्ह्यात १४७८० नागरीकांना लसीचा दुसरा डोस


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: