स्फोटक वाहतूक प्रकरणी चौथा आरोपी जेरबंद; पोलिसांनी रचला सापळा

March 28, 2021 0 Comments

अमरावती: तिवसा शहराच्या पंचवटी चौकात स्फोटक जिलेटिन स्फोटक सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. यात तिवसा पोलीसांनी सातरगाव येथील सुमित सोनोने सह अन्य दोघांना अटक केल्यानंतर आज सात दिवसांनी वर्धा जिल्ह्यातील आणखी एका आरोपीला तिवसा पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायलायात हजर केले असता न्यायलायाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजू चौधरी(रा.जाम,जिल्हा-वर्धा)असे अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीचे नाव आहे. विहिरीच्या खोदकामाकरिता वापरण्यात येत असलेल्या जिलेटिन स्फोटकाची खरेदी व देवाणघेवाणीच्या माध्यमातून व्यवहार सातरगाव येथील सोनोने यांनी केला होता. तिवसा येथून स्फोटक घेऊन जात असताच रात्रीच्या वेळेला पंचवटी चौकात ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलीस शिपाई प्रविण चव्हाण यांना दुचाकीने दोघे जण पोत्यात भरून दारू नेत असल्याच्या संशयामुळे त्यांनी दुचाकीवर असलेल्या लोकांचा पाठलाग केला होता. तेव्हा तिवसा पोलीसांनी याची सर्व चौकशी केली असता सातरगाव येथून एक तर वरुड येथील दोघांना अटक करण्यात आली होती. यातील सर्व आरोपी विरोधात पोलीसांनी कलम २८६ भा. दा. वि.सह कलम ५, स्फोटक पदार्थ अधी १९०८ सह कलम ५,९(ब)१(ब) भारतीय स्फोटक कायदा १८८४ नुसार आरोपी गुन्हे दाखल केले होते. मात्र यातील जिलेटीन स्फोटक पुरविणारा वर्धा जिल्ह्यातील आरोपी हा तिवसा पोलिसांच्या हाती सापडला नव्हता अखेर तिवसा पोलिसांनी उशिरा का होईना मात्र त्यास शिताफीने अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्यास २९ पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलीस कोठडीतील पीसीआर मध्ये आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असून याप्रकरणी पुढील तपास तिवसा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार रीता उईके या करीत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: