रेल्वे फलाट तिकीटवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष

March 04, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई ऐन उन्हाळी हंगामात फलाट तिकिटांचे दर वाढवल्यामुळे नागरिकांच्या खिशावर भार पडत असून, मध्य रेल्वेच्या निर्णयाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. गर्दी नियंत्रणाचे कारण देत मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला. मात्र गर्दी केवळ मध्य रेल्वेवरच होत आहे काय, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. १० रुपयांच्या फलाट तिकिटात पाच पट वाढ करत मध्य रेल्वेने हे तिकीट ५० रुपयांपर्यंत वाढवले आहे. इंधन-गॅस, रिक्षा-टॅक्सी दरवाढीपासून सुरू झालेला हा महागाईचा विळखा आता प्रत्येक क्षेत्राला बसत आहे. त्यात आता फलाट तिकिटाचाही समावेश झाला आहे. मुळात गर्दी नियोजनासाठी अन्य पर्याय उपलब्ध असताना तिकीट दरवाढ करणे हे कितपत गरजेचे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकल रेल्वे स्थानकाचे तिकीट १० रुपयांत सहज उपलब्ध होते. असे असताना फलाट तिकीट वाढवल्याने यातून नेमका कसा उद्देश साध्य होईल, असा सवाल प्रवासी करीत आहेत. वाचा: सध्या उन्हाळी गर्दी सुरू झाल्याने मेल-एक्स्प्रेस रेल्वे स्थानकांवर प्रवासी वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. करोनापूर्व काळातील रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. मात्र सध्या विशेष गाड्या धावत असल्याने या गाड्यांनाही प्रवाशांची चांगली मागणी आहे. अनेकदा कुटुंबातील वृद्ध सदस्यांना गाडीत बसवून देण्यासाठी तसेच त्यांचे सामान वाहून नेण्यासाठी घरातील किमान दोन सदस्य फलाटावर येतात. या नियमाने त्यांच्या खिशावर अवघ्या एक-दोन तासांसाठी भार येणार आहे. प्रवासी संघटनांचा विरोध प्रवासी संघटनेने देखील फलाट तिकिटांच्या पाच पट वाढीला कडाडून विरोध दर्शवला आहे. 'लोकलचे तिकीट ५ रुपये आहे. फलाट तिकिटासाठी ५० रुपये देण्यापेक्षा लोकल तिकीट काढून प्रवास करणे सहजशक्य आहे. भाडेवाढीपेक्षा गर्दी नियंत्रणाचे अन्य पर्याय राबवणे आवश्यक आहेत. मात्र त्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. मध्य रेल्वे प्रशासनाने या पर्यायांचा विचार करावा. नागरिकांना वेठीस धरू नये', अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनेच्या कैलास वर्मा यांनी नोंदवली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: