रिक्षा-टॅक्सीचे भाडे वाढले खरे; पण मीटर जुनेच पडतेय, कारण...

March 04, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी मुंबई: करोनात कमी झालेली प्रवासी संख्या, लॉकडाउनमुळे नागरिकांच्या कमाईवरील परिणाम अशा अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांवर रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचे ओझे टाकण्यात आले आहे. सध्या निर्बंधाचा काळ लक्षात घेता रिक्षा-टॅक्सी चालकांनी सुधारित दरानुसार भाडे अंमलबजावणीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. मीटरमध्ये बदल करण्यास तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याने मीटरमध्ये बदल केल्यानंतर सुधारित दरानुसार भाडे आकारण्यात येणार असल्याचे चालकांकडून सांगण्यात येत आहे. वाचा: रेल्वे, एसटी, बेस्टच्या प्रवासी संख्येत सातत्याने घट होत आहे. मुंबईसह राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. याचीही भीती प्रवाशांच्या मनात आहे. यामुळे चालकांना आर्थिक मदत देण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनेकडून करण्यात आली आहे. आता भाडेवाढ केल्यास किंवा प्रवाशांकडून वाढीव दराने पैसे घेतल्यास प्रवासी पाठ फिरवण्याची भीती संघटनेकडून व्यक्त होत आहे. १ मार्चपासून सुधारित भाडेवाढ लागू करण्याचे आदेश परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले. मात्र सध्या रस्त्यांवर चित्र वेगळे असल्याने अनेक चालकांनी अद्याप नव्या दरानुसार भाडे आकारण्यास सुरुवात केलेली नाही. अशा चालकांचे प्रमाण मोठे आहे. काही रिक्षा-टॅक्सीचालकांकडून ३ रुपये वाढवून भाडे घेण्यात येते. मात्र या चालकांचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून येत आहे. वाचा: सुधारीत दरानुसार मीटरमध्ये बदल करण्यासाठी ५०० ते १००० रुपये खर्च येतो. आधीच लॉकडाउनमुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. पगार कमी झाले. अशातच मीटरमध्ये बदल करण्याचा महागडा खर्चही चालकांवर असल्याने चालकांमधून ही सरकार विरोधात रोष पसरत आहे. मीटर कॅलिब्रेशनची समस्या मुंबईत रिक्षांची संख्या साडेचार लाखांहून अधिक असून टॅक्सीची संख्या ७० हजारांहून अधिक आहे. मात्र या वाहनसंख्येच्या तुलनेत मीटरमध्ये बदल करणे अर्थात मीटर कॅलिब्रेशन करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या कमी आहे. दिलेल्या मुदतीत कॅलिब्रेशन करण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: