ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनाची लागण
मुंबईः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना करोनाची लागण झाल्यानंतर राज्यातील आणखी एका मंत्र्याला करोनाची बाधा झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि गृहराज्यमंत्री यांची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. () करोना संसर्गाचा प्रमाण वाढत असताना राज्यातील नेते व सरकारमधील मंत्र्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही करोनानं ग्रासलं होतं. पण, योग्य उपचारांनंतर या मंत्र्यांनी करोनावर मात करून पुन्हा जोमानं कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे. वाचाः करोना चाचणीसंदर्भात माहिती देताना तटकरे यांनी एक ट्विट केलं आहे. 'माझी करोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी करोनावर मात करुन पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन,' असं त्यांनी म्हटलं आहे. वाचाः दरम्यान, गेल्या नऊ महिन्यात राज्यातील अनेक आजी- माजी लोकप्रतिनिधींना करोनाची लागण झाली आहे. विविध कामांच्या निमित्तानं मतदारसंघात फिरत असताना कार्यकर्ते अधिकारी, पोलीस कार्यकर्त्यांशी झालेल्या संपर्कातून लागण झाल्याची शक्यता असते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: