'अमित शहांना उशिरा का होईना जाग आली याचा आनंदच'
जळगाव: शिवसेनेने युती धर्म पाळला नसल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय नेते यांनी सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात केला होता. यावर शिवसेनेचे उपनेते व स्वच्छता मंत्री यांनी उत्तर दिले आहे. अमित शहांना दीड वर्षे उशिरा का होईना आता शुद्ध आली, याचा आनंदच असल्याची टीका पाटील यांनी आज केली. वाचा: गुलाबराव पाटील हे मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील पाळधी येथे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमित शहा हे दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग येथे एका कार्यक्रमासाठी आलेले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही. जनदेशाचा अनादर करत सत्तेसाठी शिवसेना विरोधी पक्षांसोबत गेल्याची टीका शहांनी केली होती. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी शहा यांना दीड वर्षांनी शुद्ध आली याचा मला आनंद आहे, अशा शब्दांत टीका केली. सेलिब्रिटिंना आता कशी जाग आली? शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटवरून त्यांनी सेलेब्रिटींवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, 'शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने आंदोलन केले पाहिजे, यावर सेलिब्रिटींना आता जाग आली आहे. शेतकरी ६० दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानापासून ते दिल्लीपर्यंत आंदोलन करत आहेत. शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतजमिनी हिसकावण्याचा प्रयत्न व्हायला नको, अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. पण केंद्र सरकार त्यांच्याशी बोलणी करायला तयार नाही. उलटपक्षी तुम्ही आमच्याकडे या, मग चर्चा करू, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. मात्र, शेतकऱ्याला पाठीचा कणा आहे. सरकारनं त्याच्या दरात चर्चेसाठी जायला हवे, अशी भूमिका देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी मांडली. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: