'हे' वाक्य मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कधीही उच्चारू नये; माजी खासदाराचा टोला

February 25, 2021 0 Comments

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या प्रकरणात आरोप झालेले वनमंत्री यांनी आपली बाजू मांडल्यानंतरही विरोधक मागे हटायला तयार नाहीत. चित्रा वाघ यांनी आज घटनास्थळासह वानवडी पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. (Nilesh Rane Taunts CM ) वाचा: 'राज्यातील ठाकरे सरकार संजय राठोड यांना वाचवत आहे. सगळ्या बाजूनं अडकलेले संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतात, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसतात, पण तरीही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही,' असं नीलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कधीही स्वतःच्या भाषणात ‘मी मर्द आहे' हे वाक्य उच्चारू नये,' असा टोलाही नीलेश राणे यांनी हाणला आहे. काय आहे प्रकरण? 'टिकटॉक' व्हिडिओमुळे प्रकाशझोतात आलेली पूजा चव्हाण ही सोशल मीडियावर अल्पावधीतच लोकप्रिय झालो हीत. सोशल मीडियात तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. मूळची बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथची असलेली पूजा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. पुण्यातील वानवडी भागात भाऊ आणि मित्रासोबत ती राहत होती. ८ फेब्रुवारी रोजी पूजाने इमारतीतून उडी घेऊन आत्महत्या केली. तिने तणावातून हे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले होते. मात्र, तिच्याशी संबंधित १० ते १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप भाजपकडून झाला. तेव्हापासून संजय राठोड हे गायब होते. अखेर १५ दिवसांनंतर कार्यकर्त्यांच्या सोबत बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेऊन त्यांनी आपली बाजू मांडली होती. मात्र, त्यानंतरही हे प्रकरण शांत झालेले नाही. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: