'धनंजय मुंडेंनी त्या प्रकरणात काय सेटलमेंट केली माहीत नाही'

February 25, 2021 0 Comments

मुंबई: प्रकरणात पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्यामुळं विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे सरकारमधील अन्य मंत्र्यांच्या प्रकरणांचीही या निमित्तानं उजळणी केली जात आहे. माजी खासदार यांनी सत्ताधाऱ्यांच्या एका युक्तिवादाला प्रत्युत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. ( Attacks ) विरोधकांकडून केवळ आरोप केले जातात. त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. पोलीस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे हे उद्योग आहेत, असा आरोप संजय राठोड प्रकरणी केला जात आहे. त्यासाठी धनंजय मुंडे, सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे दाखले दिले जात आहेत. सत्ताधारी नेत्यांचा हा युक्तिवाद नीलेश राणे यांनी खोडून काढला आहे. 'मुंडे प्रकरणात तक्रार करणाऱ्या मुलीवर दबाव टाकून तक्रार मागे घ्यायला लावली. ती पुढं येऊन स्वत: हे सांगणार नाही. नंतर मुंडे यांच्या दुसऱ्या बायकोनं उपोषणाचा इशारा दिला. कालांतरानं तेही प्रकरण शांत झालं. धनंजय मुंडे यांनी काय देऊन हे प्रकरण सेटल केलं आम्हाला माहीत नाही, पण जनता दुधखुळी नाही. लोकांना सगळं कळतं,' असं नीलेश राणे म्हणाले. वाचा: सुशांतसिंह प्रकरणाचा तपास ७० दिवसांनंतर सीबीआयकडे गेला. तोपर्यंत पुरावे नष्ट केले गेले. त्यानंतर सीबीआय आले. अशाने काय होणार?,' असा सवालही नीलेश राणे यांनी केला. 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. असा कुठला मंत्री आहे जो कोर्टातून सुटलाय. हे लोक स्वत:ला क्लीन चिट देताहेत. आरोप झाल्यावर साधा एफआयआर दाखल केला जात नाही. जितेंद्र आव्हाड प्रकरणात काय झालं? एका इंजिनीअरला घरी आणून बेदम मारहाण केली गेली. आव्हाड यांच्यावर साधा एफआयआर दाखल झाला नाही. कारवाई होत नाही म्हणून हे सुटताहेत. पोलिसांनी कारवाई केली असती तर ठाकरे सरकारमधील चारपैकी तीन मंत्री आतमध्ये असते,' असा दावाही नीलेश राणे यांनी केला. 'ठाकरे सरकारच्या काळात महिला, मुली अजिबात सुरक्षित नाहीत. या सरकारकडून तुम्ही काही अपेक्षा ठेवू नका. सामान्य माणसांना काही न्याय मिळणार नाही, असं सांगतानाच, 'पूजा चव्हाणला न्याय मिळाला नाही तर चौकाचौकात आंदोलन करू,' असा इशारा त्यांनी दिला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: