ठाकरे सरकारविरोधात आघाडी उघडणाऱ्या चित्रा वाघ कोण आहेत?

February 25, 2021 0 Comments

आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते व हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी व त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपकडून होतेय. भाजपच्या महिला अध्यक्ष यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन संजय राठोड व ठाकरे सरकारला कोंडीत पकडणाऱ्या चित्रा वाघ आहेत तरी कोण? जाणून घेऊया चित्रा वाघ यांची राजकीय कारकीर्द. चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप व शिवसेनेत जाणाऱ्यांची रांग लागली होती. पूर्वीश्रमीच्या अखिल भारतीय सेनेतून राजकीय कारकीर्द सुरु करणाऱ्या चित्रा वाघ यांनीही भाजपची वाट धरली. चित्रा वाघ यांचा राजीनामा हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला गेला. राष्ट्रवादीत असताना चित्रा वाघ या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली. चौकशीच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी पक्षांतर? चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणाच्या चौकशीच्या फेऱ्यापासून वाचण्यासाठी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवारांनी दिला दुजोरा चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गंत गटबाजीमुळं त्या नाराज होत्या आणि म्हणून त्यांनी पक्ष सोडला असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटबाजीचं राजकारण नाही. चित्रा वाघ या गटबाजीमुळे नाराज होऊन पक्ष सोडून गेल्या यात तथ्य नाही. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा', असं शरद पवार म्हणाले होते. संजय राठोड प्रकरणी आक्रमक पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येसाठी ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यानंतर काही दिवसांतच सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या क्लिपमध्ये ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचं संभाषण असल्याचा मुद्दा उचलत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर, भाजपच्या चित्रा वाघ यांनी पहिल्यांदाच संजय राठोड यांचे नाव घेत आरोप केले. त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: