मुंबईत शिवसेना जोरात! भाजपला दिला आणखी एक धक्का
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्के देण्याची मालिका शिवसेनेने सुरूच ठेवली आहे. अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांना प्रवेश देतानाच वेगवेगळ्या कारणांनी पक्षापासून दूर गेलेल्या जुन्या शिवसैनिकांनाही पुन्हा स्वगृही परत आणण्यासाठी शिवसेनेनं प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे सोमवारी दिसून आले. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक अनिल कदम आणि माजी नगरसेविका यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोघांनाही शिवबंधन बांधले. वाचा: नुकतेच माजी आमदार कृष्णा हेगडे, हेमेंद्र मेहता यांनी शिवबंधन बांधले. त्या पाठोपाठ कोळंबकर यांचे समर्थक मानले जाणारे अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या प्रेसिला कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत भाजपप्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनीही सेनेत प्रवेश केला. यावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते. वाचा: सध्या भाजपमध्ये असलेले आमदार कालिदास कोळंबकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर ते त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसच्या तिकिटावर ते दोनदा आमदार म्हणून निवडून आले. कालांतराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले. वडाळा, नायगाव येथे कोळंबकर यांची चांगली पकड आहे. त्यांच्या या गडालाच शिवसेनेनं खिंडार पाडलं आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: