करोना संसर्गाबाबत मुंबईकरांसाठी मोठी बातमी
करोना संसर्गाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई शहराला आता मोठा दिलासा मिळतोय. नवीन वर्षापासून करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली, तसंच, सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. या दोन महत्त्वाच्या घटनानंतर आणखी एक सकारात्म माहिती समोर येत आहे. मुंबईत करोना संसर्गाचा आकडा २६ टक्क्यांनी खाली घसरला आहे. बीएसमीच्या उपाययोजना आणि जनतेची सतर्कता यामुळं करोना रुग्णांचा आलेख घटताना दिसत आहे.करोना संसर्गाचा फैलाव करणाऱ्या विषाणूमध्ये झालेल्या बदलामुळं आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, असे दिसत होते. तसेच, थंडीमध्ये रुग्णसंख्या अधिक वेगानं वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात संसर्गावर मात करण्यासाठी घालण्यात आलेले निर्बंध तसेच लसीकरणाची सुरुवात यामुळं संसर्गाला अटकाव करण्यात मदत होत आहे. त्यामुळं रुग्णसंख्या नियंत्रित आहे. (Coronavirus in mumbai)
करोना संसर्गाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई शहराला आता मोठा दिलासा मिळतोय. नवीन वर्षापासून करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली, तसंच, सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. या दोन महत्त्वाच्या घटनानंतर आणखी एक सकारात्म माहिती समोर येत आहे. मुंबईत करोना संसर्गाचा आकडा २६ टक्क्यांनी खाली घसरला आहे. बीएसमीच्या उपाययोजना आणि जनतेची सतर्कता यामुळं करोना रुग्णांचा आलेख घटताना दिसत आहे.
बीएमसीचा मोठा दिलासा
बीएमसीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईत करोनाचे एकूण २२ हजार १०९ रुग्ण आढळले होते. तर, वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये १६ हजार ३०४ करोनाचे रुग्णांचे निदान झाले होते. या आकडेवारीनुसार करोना संसर्गाचा आकडा २६ टक्क्यांनी खाली आला आहे. जानेवारीतील १२ दिवसात तर फक्त ५००हून कमी रुग्ण सापडले तर कधी फक्त ३५० पर्यंत रुग्णसंख्या पोहचली.
रुग्णदुपट्टीचा कालावधी वाढला
दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत करोना रुग्णांच्या संख्या कमी होताना दिसत आहे. करोना रुग्ण दुपट्टीचा कालावधीही फ्रेब्रुवारीमध्ये ५८० दिवसांवर पोहोचला आहे. त्याच बरोबर रुग्णवाढीचा साप्ताहिक दर ०. १३ टक्के होता तो आता कमी होऊन ०. १२ टक्के झाला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९६. ३७ टक्के इतके नोंदवले आहे. तर, रुग्णांच्या दुपटीकरणाचा कालावधी वाढला आहे. राज्यामध्ये डिसेंबरमध्ये ४२० दिवस तर जानेवारीत हा कालावधी ५६५ दिवसांचा होता.
करोना मृतांच्या संख्येत घट
मुंबई लोकल सुरु झाल्यानंतर करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, आता रुग्णवाढीचे चित्रे पालटले आहे. लोकल सुरु झाल्यानंतरही करोना रुग्णांच्या वाढीबरोबरच करोना मृतांच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. सोमवारी करोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या फक्त ३ होती. याआधी १७ मार्च रोजी मुंबईत १ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.
जुलैनंतर करोना संसर्गाची परिस्थिती
जुलैनंतर करोना रुग्णांच्या मृत्यूनंतर संख्या आटोक्यात आली आहे. नाताळनंतर रुग्णांच्या मृत्यूची संख्या ६ ते १२ या दरम्यान होती, तर, २०२१मध्ये जानेवारीत मृत्यूंची संख्या १ ते १० दरम्यान होती. मुंबईत सोमवारी करोनाचे ३९९ नवीन करोना रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर ५०२ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर, राज्यात करोनाचे २ हजार २१६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, ३ हजार ४२३ रुग्ण बरे झाले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: