चौकशी कोणाची होणार?; भाजपच्या टीकेनंतर गृहमंत्र्यांनी दिलं 'हे' उत्तर
मुंबईः शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ विदेशातील सेलिब्रिटींनी ट्वीट केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या एकसमान ट्वीटमुळं देशात राजकारण तापलं आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटायला सुरुवात झाली आहे. कलाकारांनी केलेल्या ट्वीटची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर भाजपनं महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे देखील भाजपाचा दबाव असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे या भाजपा कनेक्शनची चौकशी व्हावी अशी मागणी सावंत यांनी देशमुख यांच्याकडे केली. यावेळी देशमुख यांनी या विषयावर नियमांनुसार कारवाई करण्याचे आश्वासन सावंत यांना दिले. या पार्श्वभूमीवर भाजपनं आघाडी सरकारवर टीका केली होती. या टीकेला गृहमंत्री यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा: भाजपनं सेलब्रिटींच्या ट्विटच्या चौकशीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपनं केलेल्या टीकेनंतर अनिल देशमुख यांनी एक ट्विट केलं आहे. भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत. पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे, असं अनिल देशमुखांनी स्पष्ट केलं आहे. वाचाः दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही ट्विट करत भाजपची चौकशीची करण्याची मागणी केली होती सेलिब्रिटींची नाही, असं स्पष्ट केलं आहे. भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक आम्ही केलेल्या मागणीचा विपर्यास करून बोंब ठोकत आहे. आम्ही भाजपाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे, सेलिब्रिटींची नाही. उलट सेलिब्रिटींना भाजपा पासून संरक्षण द्यावे ही मागणी केली आहे. देशपातळीवर भाजपाकडून लोकशाही मानक पायदळी तुडवले जात आहेत, अशी टीकाही सावंत यांनी केली आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: