संजय राठोड खरोखरच गायब झालेत?; अजित पवार म्हणाले...

February 18, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी विरोधकांनी आरोपांची राळ उडविली असली तरी, शिवसेनेचे वैदर्भीय नेते तथा वनमंत्री गायब नाहीत, असे उपमुख्यमंत्री यांनी मुंबईत बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून, अजून एक-दोघांना ताब्यात घेतले जात आहे. पोलिस त्यांचे काम करत आहेत. मोठ्या व्यक्तीचे नाव आले की, वेगळी प्रसिद्धी मिळत असते. पण आमचा अंदाज आहे, चौकशीनंतरच सत्य बाहेर येईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. (Ajit Pawar on ) 'आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांच्याबाबत असेच घडले. आरोप झाल्यावर राजीनामा घेतला असता, तर त्यांची स्वत:ची बदनामी झाली असती, नंतर आरोप करणाऱ्या व्यक्तीने तक्रार मागे घेतली,' असे अजित पवार सांगितले. वाचा: या प्रकरणात कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचे अथवा पदावरून हटवायचे हे कितपत योग्य आहे, हा विचार करण्याजोगा भाग आहे. अर्थात ते शिवसेनेचे नेते आहेत. त्याबद्दल शिवसेनाच भूमिका घेईल. जोपर्यंत चौकशीच्या बाबतीत अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत थोडा संयम बाळगायला हवा. मला माहिती मिळाली की, ते गुरुवारी स्पष्टीकरण देतील. कोणावर असे आरोप झाले, तर त्याची रितसर चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत कोणावर आरोप करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी संजय राठोड प्रकरणावर दिली आहे. वाचा: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना काळजी घ्यावी. करोना असताना कामदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड मेट्रोला मंजुरी दिली आहे, याबाबत केंद्राकडून निधी दिला जाणार आहे. हा प्रस्ताव केंद्राकडे जाईल, असेही ते म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: