आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल
मुंबईः राज्यात पुन्हा करोना रुग्णसंख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. करोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा असतानाच. सोशल मीडियावरही लॉकडाऊनच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर, काही ठिकाणी अफवांनाही पेव फुटलं आहे. अलीकडेच आरोग्यमंत्री यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील बनावट क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यावर आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करत खुलासा केला आहे. मास्क न वापरण्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र, या आवाजातील आवाज माझा नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. वाचाः करोनाबाबतीत काही मोठा निर्णय किंवा सूचना असतील तर आरोग्यमंत्री पत्रकार परिषद किंवा ट्विटरच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विनामास्क फिरवणाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री सूचना देत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचं समोर आलं आहे. वाचाः लॉकडाऊनचे संकेत करोना संसर्गजन्य परिस्थितीत नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय उरेल आणि लोकहितासाठी तो कठोर निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी ठामपणे सांगितले. युरोपात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला, याकडे लक्ष वेधताना राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कडक नियमांचा निर्णय घेऊ, असेही राजेश टोपे यांनी नमूद केले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: