'जनता वाऱ्यावर आहेच, किमान तुमच्या मंत्र्याला तरी शोधा'

February 18, 2021 0 Comments

मुंबई: सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यापासून कुणाच्याही संपर्कात नसलेले राज्याचे वनमंत्री यांच्यावरून राज्य सरकार विरोधकांच्या टीकेच्या रडारवर आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते रोजच्या रोज संजय राठोड यांच्याबद्दल सरकारला धारेवर धरत आहेत. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते यांनी आज याच मुद्द्यावरून सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. (Where Is , BJP Questions Thackeray Government) वाचा: केशव उपाध्ये यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. 'महाराष्ट्रात सर्वसामान्य सुरक्षित नाहीत हे तर दिसतच होतं पण आता मंत्री महोदय १० दिवस गायब आहेत आणि कुणालाच सापडत नाही यापेक्षा राज्याची वाईट अवस्था काय असू शकते?,' असा प्रश्न त्यांनी केला आहे. 'महिलांवर अत्याचार वाढले आहेत, गुंड रस्त्यावर मिरवणुका काढत आहेत, हे सगळं महाराष्ट्र पाहतोय. पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब आहेत. ना आता ना पता. जनतेला वाऱ्यावर सोडलं हे दिसतय पण आता तर थेट राज्याचा कॅबिनेट मंत्रीच गायब असल्याबद्दल उपाध्ये यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 'रोज तुमच्या सोबत बसणारा सहकारी मंत्री ११ दिवस गायब आहे त्याला तरी शोधा,' असं आवाहन उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना केलं आहे. काय आहे प्रकरण? मूळची बीडची असलेली २२ वर्षीय पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय होती. ८ फेब्रुवारी रोजी तिनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचे समोर आले. तेव्हापासून राठोड हे 'नॉट रिचेबल' आहेत. सतत आरोप होत असूनही त्यांनी एकदाही आपली बाजू मांडलेली नाही किंवा ते माध्यमांसमोर आलेले नाहीत वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: