'इतिहासात घडले नाही ते मोदींच्या कार्यकाळात घडणार'

February 21, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सलग १२व्या दिवशी वाढ झाल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी केंद्र सरकारवर टीका केली. भारताच्या इतिहासात जे कधीही घडले नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार असल्याचे दिसते आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दराचे शतक अवघे ९० पैसे दूर आहे, असे ट्वीट करून त्यांनी या दरवाढीचा निषेध नोंदवला. पंतप्रधान यांनी दोन दिवसांपूर्वी पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीसाठी मागील केंद्र सरकारांना जबाबदार ठरवले होते. २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत ११० डॉलर असताना मुंबईत पेट्रोल ८० आणि डिझेल ६३ रुपयांना मिळत होते. आज कच्चे तेल ६५ डॉलरला असताना मुंबईत पेट्रोल ९६.३०, तर डिझेल ८७.३० रुपयांवर आहे. यासाठी केवळ मोदी सरकारची नफेखोरी कारणीभूत आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होत असताना मोदी सरकारने सतत कर वाढवले. सर्वसामान्यांच्या खिशावर तब्बल २० लाख कोटी रुपयांचा डल्ला मारला. तेच पंतप्रधान आज पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीसाठी यापूर्वीच्या सरकारांना जबाबदार धरतात, हे हास्यास्पद आहे, असे ते म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: