OBC समाजात कोणी घुसण्याचा प्रयत्न केला तर... ; विजय वडेट्टीवार यांचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, जालना 'जागते रहो..एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी (OBC) समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत, ओबीसी समाजात घुसू पाहणाऱ्यांना हा इशारा आहे, असे वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री (Vijay Vadettiwar) यांनी केले आहे. गायकवाड समिती ही मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाची समिती होती. मात्र या समितीवर मागासवर्गीयच नव्हते हाच खरा मुद्दा आहे. तरी देखील एसीबीसी तून मराठा समाजाला आरक्षण घेण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. परंतु काही विघ्नसंतोषी त्याला वेगळे वळण देण्यासाठी काम करत आहेत असेही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी जालन्यात रविवारी सकाळी ओबीसी मोर्चात सहभागी नोंदवला. त्यावेळी ते बोलत होते. ( gives warning on obc reservaion) औरंगाबाद येथील शाम सराटे यांनी केलेल्या सर्वेक्षण केले. त्यानंतर ते असे म्हणत आहेत की मराठा समाज हा ओबीसी आहे असे वडेट्टीवार यांनी सांगितले. हा मोर्चा राजकीय पक्षाच्या पलीकडील आहे. ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून आपण मोर्चात सहभागी होत आहोत आणि मंत्री म्हणून समाजाच्या व्यथा ऐकणार असल्याचे त्यांनी सांगितले. केन्द्र सरकारने ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी साडे अकरा वाजता भव्य मोर्चाला सुरूवात झाली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ओबीसी समाजातील नागरिकांनी खूप मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला आहे. मोर्चामध्ये ढोलताशा पथके आणि विविध वाद्य परंपरागत नृत्य आणि गीते सादर केली जात आहेत. विशेष म्हणजे बंजारा महिला आणि पुरूषांच्या नृत्य प्रकाराने परिसरात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या सगळ्या भागातील ओबीसी समाजातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत. क्लिक करा आणि वाचा- शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला आहे. जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच खाद्यपदार्थ मोर्चातील सहभागींना देण्यासाठी स्टॉलही लावण्यात आले आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: