पुण्यात ७० वर्षीय वृद्ध महिला घरात पडली आणि...

January 01, 2021 0 Comments

पुणे: दाराची कडी लागल्यामुळं घरात अडकून पडलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे. सहकार नगरमधील तुळशीबागवाले कॉलनीत आज सकाळी ही घटना घडली. वाचा: एका घरातील वृद्ध महिला दरवाजा उघडत नसून कोणताही प्रतिसाद देत नसल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला काही लोकांनी दिली होती. त्या माहितीवरून जनता वसाहत अग्निशमन केंद्राचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले. तसंच, हा प्रकार पोलिसांनाही कळवण्यात आला. तिथं पोहोचताच अग्निशमन दलाच्या जवानांनी अडकलेल्या महिलेची माहिती घेतली व पहिल्या मजल्यावर शिडी लावून पाहणी केली. तेव्हा संबंधित महिला पडलेल्या अवस्थेत निदर्शनास आली. जवानांनी क्षणाचाही विलंब न करता खिडकी जवळच असलेली लोखंडी जाळी कटरच्या साहाय्याने कापत त्या घरात प्रवेश केला व कडी उघडून महिलेची सुखरूप सुटका केली. वाचा: ही ज्येष्ठ महिला घरात काम करताना अचानक पडली होती. त्यांना उठणे शक्य नव्हते व त्या आवाजाला प्रतिसादही देऊ शकत नव्हत्या, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. महेंद्र सकपाळ, संदीप घडशी व शैलेश गोरे तसेच वाहन चालक ॠषीकेश बिबवे यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. वेळेत मदत मिळाल्याने स्थानिकांनी अग्निशमन दलाचे आभार मानले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: