मोठी बातमी! धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार मागे

January 22, 2021 0 Comments

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या महिलेनं मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं हे वृत्त दिलं आहे. बॉलिवूडमध्ये काम मिळवून देतो असं सांगून धनंजय मुंडे यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप रेणू शर्मा हिनं केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं हे आरोप केले होते. रेणू शर्माची मोठी बहीण करुणा शर्मा हिच्यासोबत धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोपही तिनं केला होता. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. करुणा शर्मा हिच्याशी संबंध असल्याची कबुली स्वत: मुंडे यांनी दिली होती. तसंच, आपल्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना देखील याची कल्पना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, रेणू शर्मा हिनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळं ते अडचणीत आले होते. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. हे सगळं घडत असतानाच रेणू शर्मा ही एक ब्लॅकमेलर असल्याचा आरोप इतर राजकीय पक्षातील काही नेत्यांनीही केला होता. भाजपचे कृष्णा हेगडे व मनसेचे संतोष धुरी यांनीही तिच्यावर आरोप केले होते. रेणू शर्मा हिनं सतत फोन करून आपल्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार हेगडे यांनी पोलिसांत केली होती. त्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं. पोलिसांकडून याबाबत सखोल चौकशी सुरू असतानाच रेणू शर्मा हिनं आता माघार घेतली आहे. वाचा: एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रेणू शर्मा हिनं तक्रार मागे घेण्याची तयारी दाखवल्यानंतर पोलिसांनी तिला तिचं म्हणणं प्रतिज्ञापत्रावर देण्याच्या सूचना केल्या आहेत. हे प्रतिज्ञापत्र नोटरी करून घेतलं जाणार आहे. भविष्यात तिनं पुन्हा आपली भूमिका बदलू नये म्हणून ही खबरदारी घेतली जात असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. रेणू शर्मा म्हणते... तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात रेणू शर्मा म्हणते, 'धनंजय मुंडे आणि माझ्या बहिणीमधील संबंध बिघडले होते. त्यामुळं मी मानसिक तणावात होते. मुंडे यांच्याविरोधात मी केलेल्या तक्रारीचा राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी वापर केला जात असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. मी मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेत आहे. माझी बलात्कारासंदर्भात तक्रार नाही.'


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: