मुंडेंच्या बाबतीत आमचा निर्णय योग्य ठरला: शरद पवार

January 22, 2021 0 Comments

कोल्हापूर: सामाजिक न्यायमंत्री यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार हिनं मागे घेतली आहे. या नव्या घडामोडींमुळं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षाचे अध्यक्ष यांनी यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. 'धनंजय मुंडे यांच्या बाबतीत आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता हे आता समोर आलंय,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ( on Allegations Case) कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'मुंडे यांच्यावर झालेले आरोप निश्चितच गंभीर होते. मात्र, त्यातील सत्यता पडताळून पाहण्याची गरज असल्याचं मला वाटत होतं. त्यामुळं सत्यता पडताळून पाहण्याची प्रक्रिया पक्षानं सुरू ठेवली. मात्र, खोलात जाऊन माहिती घेतल्यानंतर यात फारशी सत्यता नसल्याचं आम्हाला समजलं. कुणाची तरी बदनामी करण्यासाठी आरोप करायचे आणि नंतर ते मागे घ्यायचे हे त्यातून दिसत होतं. आमचा तो निष्कर्ष खरा ठरला. त्यामुळं मुंडे यांच्याबाबतीत कुठलीही घाई न करण्याचा आमचा निर्णय योग्य होता असं वाटतं,' असं पवार म्हणाले. वाचा: बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून धनंजय मुंडे यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप रेणू शर्मा हिनं केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं हे आरोप केले होते. त्यानंतर मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तिनं तक्रारही दाखल केली होती. रेणू शर्माची मोठी बहीण करुणा शर्मा हिच्यासोबत धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोपही तिनं केला होता. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला होता. पक्षानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. मात्र, तक्रारदार महिलेवरच आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीनं पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडे यांच्याबद्दल पुढील निर्णय घेण्याचं ठरवलं होतं. तो निर्णय योग्य होता, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: