नवी मुंबई: उघड्यावर लघुशंका करण्यापासून रोखले, तरुणाची हत्या

January 04, 2021 0 Comments

नवी मुंबई: येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यापासून रोखणाऱ्या तरुणाची चौघांनी हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सचिन पाटील (वय ३५) हा शुक्रवारी जखमी अवस्थेत रस्त्यालगत पडलेला होता. जवळच्या रुग्णालयात काही जणांनी त्याला दाखल केले. मात्र, तिथे त्याला तपासणीनंतर मृत घोषित केले, अशी माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दिली. आकाश गायकवाड (वय २०) याचे पाटीलसोबत भांडण झाले होते. पाटीलने आकाशला उघड्यावर लघुशंका करण्यापासून रोखले होते. साठे नगरमध्ये ही घटना घडली. गायकवाड आणि अन्य तिघा मित्रांनी पाटीलला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत तिथेच सोडून पसार झाले, अशी माहितीही पोलिसांनी दिली. पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता, ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: