कंगनाच्या त्या ट्विटचा आधार घेत रोहित पवारांनी भाजपला घेरलं; म्हणाले...

January 04, 2021 0 Comments

मुंबईः शिवसेना नेत्या आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील ट्विटर वॉर सध्या चर्चेचा विषय ठरतोय. हाच धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार यांनी कंगनाच्या ट्विटचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतील खार येथे नवं कार्यालय खरेदी केलं आहे. त्यावरुनच कंगना राणावतनं उर्मिला यांना टोला लगावला होता. मी स्वतःच्या कष्टानं बांधलेलं घरही काँग्रेसनं तोडून टाकलं. भाजपला खूष करुन माझ्यावर फक्त २५ - ३० कोर्ट केस आहेत. मी सुद्धा हुशारीनं काँग्रेसला खूष केलं असतं तर बरं झालं असतं, मी खरंच मुर्ख आहे, असं ट्विट कंगनानं केलं होतं. कंगनाच्या या ट्विचवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. कंगनानं उर्मिला यांच्यावर टीका करताना केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट ट्विट करत कंगना व भाजपवर निशाणा साधला आहे. 'भाजपला खूष करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपचा मुखवटा टरकावत खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल कंगना राणावतचं अभिनंदनच करायला पाहिजे. या द्रोहाबद्दल भाजपला काय शिक्षा घ्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल,' असा टोला रोहित पवारांनी भाजपला लगावला आहे. दरम्यान, कंगनानं केलेल्या आरोपांवर उर्मिला मातोंडकर यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे. वेळ आणि जागा तू सांग. माझ्या खरेदीच्या व्यवहाराची कागदपत्रे घेऊन तुला भेटायला येते. या कागदपत्रांमध्ये २०११मध्ये स्वतःच्या मेहनतीनं अंधेरीत फ्लॅट विकत घेतल्याचा पुरावा मिळेल.राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून ऑफिस विकत घेतलं आहे, हेही दाखवेन, असं उत्तर उर्मिला यांनी दिलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: