कचरा जाळताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट; महिलेचा आगीत होरपळून मृत्यू

January 04, 2021 0 Comments

कोल्हापूरः करोना संकटाच्या काळात जीवनावश्यक वस्तू ठरलेल्या सॅनिटाझरमुळं एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोटात ही महिला गंभीर जखमी झाली होती. मात्र, आज उपचारादरम्यान या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कागल तालुक्यातील बोरवडे भागातील ही घटना आहे. २७ डिसेंबरला सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत असताना त्यामध्ये एक सॅनिटायझरची बाटलीदेखील होती. बाटलीत शिल्लक असलेल्या सॅनिटायझरमुळं आग अधिक भडकली. सुनीता या तिथंच असल्यानं त्यांच्या साडीनं पेट घेतला त्यात त्या ८० टक्के भाजल्या होत्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने सीपीआर येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं होतं. मात्र, आठ दिवसांच्या उपचारांनंतर आज त्यांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे सॅनिटायझरचा वापर आता रोजचाच होत असताना अशा घटनांमुळं नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, सॅनिटायझरमध्ये अल्कहोल हा ज्वलनशील पदार्थ असतो. त्यामुळं त्याचा आगीशी थेट संपर्क आल्यास तो पेट घेऊ शकतो. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातली सॅनिटायझरमुळं एका महिलेचा मृत्यू झाला होता. करोनाचं महामारीचं संकट सुरु झाल्यापासून अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचं चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळं प्रशासनाकडूनही नागरिकांनी सॅनिटायझर वापरताना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: