शिवसेनेचा भाजपला धक्का; मुंबईतील महत्त्वाचा मोहरा गळाला

January 27, 2021 0 Comments

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून वॉर्डावॉर्डातील तटबंदी भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेनं यात आघाडी घेतली असून भारतीय जनता पक्षाचा महत्त्वाचा मोहरा सेनेच्या गळाला लागला आहे. माजी नगरसेवक व मुंबई भाजपचे सचिव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Big Jolt to BJP, Former Corporator ) वाचा: समीर देसाई यांनी आज 'मातोश्री' निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते. समीर देसाई हे माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत कामत यांचे भाचे आहेत. त्यांनी यापूर्वी दोन वेळा महापालिकेत काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं आहे. गोरेगावमधून ते नगरसेवक होते. मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर ते दहा वर्षे सदस्य होते. वाचा: मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून २०१४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देसाई यांना भाजपमध्ये आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. मात्र, पक्ष प्रवेशानंतर ते राजकीयदृष्ट्या अडगळीत होते. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. शिवसेनेत त्यांना नेमकी कोणती जबाबदारी मिळते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. वाचा: गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचं मुंबई महापालिकेवर वर्चस्व आहे. २०१७ च्या निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या भाजपनं शिवसेनेला जोरदार टक्कर दिली होती. मात्र, राज्यातील राजकीय समीरकरणांमुळं भाजपनं महापालिकेत शिवसेनेला दुखावले नव्हते. आता राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळं राजकीय समीकरणं पुरती बदलली आहेत. भाजपनं यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुंबईवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी रणनीती आखली जात आहे. शिवसेनेनं त्या दृष्टीनं तयारी केली आहे. समीर देसाई यांचा प्रवेश याचाच भाग मानला जात आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: