तेव्हा १० दिवस मुंबई धगधगत होती; मुख्यमंत्र्यांनी सांगितली बालपणीची आठवण

January 27, 2021 0 Comments

मुंबईः मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज महाराष्ट्र :संघर्ष आणि संकल्प’या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. यावेळी त्यांनी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी सीमावादावर केलेल्या आंदोलनाची आठवण सांगितली आहे. 'सीमाभागासंबंधी निवेदन देण्यासाठी मोरारजी देसाई यांच्या ताफ्यासमोर झालेलं आंदोलन आणि त्यानंतरचं राजकीय घटनाक्रम याबाबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी आंदोलन पेटलं असताना तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत आले होते. त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येनं माहिम चर्च परिसरात उपस्थित होते. पण देसाईंचा ताफा एका क्षणासाठीही न थांबता निघून गेला,' असं म्हणत त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला आहे. वाचाः 'पंतप्रधानांचा ताफा थांबला नाहीच, उलट एका फोटोग्राफर आणि कार्यकर्त्याला उडवून निघून गेला. त्यानंतर दगडफेक झाली. पोलिस आणि शिवसैनिक आमनेसामने आले. आम्ही तेव्हा कलानगरला राहत होते. दादर शिवाजी पार्कात जिथं घर होतं तिथे मार्मिकची कचेरी होती. मी सात- आठ वर्षांचा होतो,' असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. वाचाः 'तेव्हा गोळीबार, लाठीमार झाल्याचे फोन यायचे. आम्ही मध्यरात्री दोन- अडीचच्या सुमारास दादरहून परतत असताना बाळासाहेबांनी माँ साहेबांना बॅग भरुन ठेवायली सांगितली कारण त्यांना अटक होणार असल्याची कल्पना आधीच आली होती आणि त्यांचा तो अंदाज खराही ठरला, पुढची १० दिवस मुंबई धगधगत होती,' असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: