पुणे: डेटींग अॅपवर मैत्री; लॉजवर गेल्यानंतर महिलेने तरुणाला...

January 27, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, : ऑनलाइन डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर तरुणांना भेटण्यासाठी बोलवून त्यांना गुंगीचे औषध पाजून तरुणीने लुटल्याच्या दोन घटना परिसरात उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील तरुणीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातील शिरोढोण येथील २४ वर्षीय तरुणाने याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण हा स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतो. त्याची आरोपी तरुणीसोबत ऑनलाइन डेटिंग अॅपवरून ओळख झाली होती. त्यांच्यात संवाद झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक घेतले. एके दिवशी तरुणीने तिला मद्यपान करायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी तक्रारदार तरुणाने तिला बारमध्ये जात असल्याचे सांगितले. पण, त्या ठिकाणी कोणी बघेल, त्यामुळे आपन एखाद्या लॉजवर जाऊ, असे तरुणी म्हणाली. ३ जानेवारी रोजी पुण्यातील खराडी परिसरातील एका लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलावले. त्या ठिकाणी गेल्यानंतर आरोपी तरुणीने तिच्यासोबत आणलेली दारू प्यायली. तर, तरुणाला शीतपेयातून गुंगी येणारे औषध पिण्यास दिले. तरूण बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याची साखळी व मोबाइल असा एक लाख दहा हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाली. तरुणाला रात्री दहाच्या सुमारास शुद्ध आल्यानंतर त्याला लुटल्याचा प्रकार लक्षात आला. पण, याबाबत कोठे बोलल्यास त्याचीच बदनामी होईल. तसेच, घरातील नागरिकांना समजेल. त्यामुळे त्याने पोलिसांकडे तक्रार लवकर केली नाही. पण, शेवटी असे प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे, असी माहिती विवेक सिसाळ यांनी दिली. श्रीरामपुरच्या तरुणालाही लुटले श्रीरामपूर येथील ३३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. या व्यक्तीची देखील ऑनलाइन डेटिंग अॅपवरूनच तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांना देखील तरुणीने खराडी येथील एका लॉजवर भेटण्यासाठी बोलावले. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दोघे त्या लॉजवर गेले. त्यानंतर तिने शीतपेयातून गुंगीचे औषध प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर तक्रारदार बेशुद्ध पडला. त्यानंतर तरुणीने त्यांच्या अंगावरील ४५ हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी हिसकावून नेली. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास तक्ररादार बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना रात्री सव्वा आठच्या सुमारास जाग आली. त्यानंतर अंगावरील सोन्याची साखळी गायब होती. तसेच, तरुणी देखील गायब होती. त्यांची मनस्थिती ठीक नसल्यामळे उशिरा तक्रार दिल्याचे चंदननगर पोलिसांनी सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: