मेट्रो कारशेड मुंबईत कुठे होणार? जागेसाठी समिती

January 07, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडला पर्यायी जागा सुचविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्य सरकारला मेट्रो कारशेडच्या जागेबाबत शिफारस करणार आहे. नगरविकास विभागाने बुधवारी याबाबतचा निर्णय जारी केला. सरकारने या समितीला कार्यकक्षा निश्चित करून दिली आहे. आरे येथील यापूर्वी मेट्रो ३ कारशेड डेपोसाठी प्रस्तावित केलेला आराखडा पुरेसा आहे किंवा आणखी जमीन किंवा वृक्षतोड करण्याची आवश्यकता भासेल का, याबाबतची तपासणी करणे, मेट्रो तीन आणि सहा यांच्या मार्गिकेचे एकत्रीकरण सुलभ करणे शक्य आहे का, यासाठी अंदाजित खर्च आणि कालावधी या बाबी तपासणे, येथील जागा आरेपेक्षा सुयोग्य आहे का, याची तपासणी करणे आणि मेट्रो ३, ४ आणि ६ यांच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथे जागा पुरेशी आणि सुयोग्य आहे का, याचा तपास करणे या बाबींचा सविस्तर अहवाल समिती राज्य सरकारला सादर करणार आहे. मेट्रो प्रकल्पांची कार्यक्षमता व दीर्घकालीन नियोजन यांचा विचार करून कारशेडसाठी पर्यायी जागा निश्चित करण्यासाठी ही समिती राज्य सरकारला शिफारस करणार आहे. या समितीत पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, मुंबई महापालिका आयुक्त, कोकणचे विभागीय आयुक्त, परिवहन आयुक्त, मुंबई मेट्रोचे सहव्यवस्थापकीय संचालक, आयआयटी मुंबईचे प्रा. के. व्ही. कृष्णा राव, डायरेक्ट वर्क्स मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे प्रमोद आहुजा आणि अतिरिक्त महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सोनिया सेठी यांचा समावेश आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: