...म्हणून करोनामुक्तांनाही लस देणे गरजेचे; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्ग होऊन गेलेल्या व त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटिबॉडी असतील तरीही लसीकरणाची गरज आहे. झाल्याने लसीकरणाची गरज नाही, या भ्रमामध्ये राहू नये, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. करोना झाल्यानंतर शरीरामध्ये तयार झालेल्या अँटिबॉडी किती दिवस शरीरात राहतात, या संदर्भात अद्याप वैद्यकीय निश्चिती नाही. ज्यांनी वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत, त्या प्रत्येकाच्या शरीरात अँटिबॉडीचे प्रमाणही वेगवेगळे आहे. सप्टेंबरमध्ये नायर रुग्णालयामध्ये काही डॉक्टरांना पुन्हा करोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे शरीरात अँटिबॉडी आहेत, म्हणून घेऊ नये हा दावा फोल ठरेल, याकडे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांनी लक्ष वेधले आहे. सूक्ष्मजीव शास्त्रातील अभ्यासक प्रा. डॉ. माधव साठे यांनी लशीच्या संदर्भातील वैद्यकीय विश्लेषण करताना सांगितले, की चिपांझीमधील अडिनो विषाणूचा समावेश लशींमध्ये करण्यात आला आहे. करोना विषाणूमध्ये जे प्रोटिन तयार करण्याची व्यवस्था आहे त्यातील काही प्रोटिन अडिनो विषाणूमध्ये समाविष्ट केले आहेत. त्याला वैद्यकीय परिभाषेत 'कॅरिअर व्हेक्टर' असे म्हंटले जाते. लशीचा बूस्टर डोस चार आठवड्यांनी द्यावा लागतो. हा विषाणू मानवी शरीरात दुप्पट /रेप्लिकेट होणार नाही असा त्यात बदल केलेला असतो. अडिनो विषाणू शरीरात लशीमधून आल्यावर टी सेल्स आणि बी पेशी सक्रिय होतात. त्यानंतर जेव्हा अशा व्यक्ती करोनाच्या संसर्गात येतील तेव्हा अँटिबॉडी असल्यामुळे हा विषाणू मानवी पेशीमध्ये शिरकाव करण्यात असमर्थ ठरेल. त्यामुळे करोनाचा संसर्गाला प्रतिबंध होईल. करोनामुळे होणारे मृत्यूही टळतील. जे. जे. रुग्णालयातील ट्रायल्समधील सहअन्वेषक डॉ. दिनेश धोंडी यांनीही अँटिबॉडीसंदर्भात लस घेणे महत्त्वाचे असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती प्रतिबंधासाठी मदतगार ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. .. तर पुनर्संसर्ग सौम्य लसीकरणानंतर पुन्हा संसर्ग झाला तरी तो अतिशय सौम्य असेल. करोना संसर्गाचा शिरकाव शरीरात झाला तरी तो पेशींमध्ये जाऊ शकणार नाही. लशीसंदर्भात केलेला दावा खरा ठरला तर करोना होणार नाही; झाला तर तो गंभीर असणार नाही, असा विश्वास नायर रुग्णालयाच्या ट्रायल्समध्ये सहभागी असलेल्या डॉक्टरांनी व्यक्त केला. लशीमार्फत शरीरात गेल्यानंतर अडिनो विषाणूचा हा गुणाकार होणार नाही. त्यामुळे त्याचे वेगळे दुष्परिणाम भेडसावणार नाहीत. लस सुरक्षित आहे. जेव्हा विषाणूमध्ये गुणाकार होण्याची क्षमता असते तेव्हा ती लस सक्रिय ठरते, नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लशीमध्ये हे सूत्र वापरण्यात येते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: