Arif bhujwala: ड्रग्ज प्रकरणी दाऊदच्या भावाचा जवळचा साथीदार एनसीबीच्या जाळ्यात

January 25, 2021 0 Comments

मुंबई: ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, एनसीबीला मोठे यश मिळाले आहे. मुंबईत एनसीबीने याला रायगडमधून अटक केली आहे. आरिफ हा मोठा ड्रग डीलर असून, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीश इब्राहिमचा जवळचा साथीदार असल्याचे सांगितले जात आहे. एनसीबीने केलेली ही अटकेची कारवाई दाऊद इब्राहिमसाठी मोठा झटका मानला जात आहे. आरिफ भुजवाला दाऊदचा भाऊ अनीश याचा जवळचा साथीदार असल्याचे समजते. आरिफच्या ड्रग्जच्या तस्करीतून मोठी कमाई केली आहे. आरिफकडे १०० कोटींहून अधिकची संपत्ती आहे. त्यात महागड्या गाड्या, फ्लॅट आणि भूखंड यांचा समावेश आहे. तत्पूर्वी, एनसीबीने आरिफच्या अटकेसाठी त्याच्या लॅबवर छापे मारले होते. मात्र, आरिफ तेथून पसार झाला होता. एनसीबीच्या हाती मोठे घबाड लागले होते. ड्रग्जचा साठा आणि रोकड असा कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला होता. आरिफ हा चिंकू पठाण याचा भागीदार आहे. चिंकू याला एनसीबीने काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. चिंकू हा गँगस्टर करीम लाला याचा नातेवाइक आहे आणि त्याला नवी मुंबईतून अटक केली होती. चिंकू हा दाऊदचा जवळचा साथीदार असल्याचे सांगितले जात आहे. आरिफ हा अलीकडेच दोनदा दुबईला गेला होता. आरिफ ड्रग्जची लॅब चालवत होता. तेथे मेफेड्रोन, मेथमफेटामाइन आणि एफेड्रिन यांसारखे अंमली पदार्थ एका फ्लॅटमध्ये तयार केले जात होते. मुंबईच्या डोंगरी परिसरात ही फॅक्टरी होती. बुधवारी सकाळी मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने ड्रग तस्कर चिंकू पठाणला अटक केली होती.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: