त्यांची नावं उघड करू का?; 'त्या' प्रश्नावर अजित पवार भडकले

January 25, 2021 0 Comments

पुणे: सामाजिक न्यायमंत्री यांच्यावरील बलात्कराची तक्रार रेणू शर्मा हिनं मागे घेतली आहे. त्यामुळं हे प्रकरण शांत होईल असं वाटत असलं तरी विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. विरोधकांच्या या आरोपांबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री यांनी नाराजीचा सूर लावला. (Question on irked Deputy CM ) गायिका रेणू शर्मा हिनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तसंच, काही आरोपही केले होते. यापैकी रेणू शर्मा हिच्या बहिणीशी संबंध असल्याची व तिच्यापासून दोन मुलं असल्याची कबुली मुंडे यांनी दिली होती. त्यावरून जोरदार वादळ उठले होते. बलात्काराच्या तक्रारीमुळं मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र, तक्रारच मागे घेतली गेल्यामुळं त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसऱ्या पत्नीपासून दोन मुलं असल्याची बाब मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवली असल्यानं त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली आहे. वाचा: पुण्यात झालेल्या एका बैठकीनंतर ते बोलत होते. 'धनंजय मुंडे यांनी माहिती लपविली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर पत्रकारांनी अजित पवार यांची प्रतिक्रिया विचारली असता, ‘इतरही काही लोकांनी माहिती लपविली आहे. त्यांची माहिती माझ्याकडे आहे. त्याची नावे उघड करू का?,' असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. सीरम इन्स्टिट्यूमधील आगीचे ऑडिट झाल्याशिवाय चित्र स्पष्ट होणार नाही. त्यानंतर सरकार, उद्योगपती यांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याविषयीचे पावले उचलली जातील, असं त्यांनी सांगितलं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: