कौतुकास्पद ! पदवीधर युवकाने खडकाळ माळरानावर फुलविली डाळिंब बाग
मच्छिंद्र आनरसे मिरजगाव : कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील पदवीधर शेतकरी विवेक रायकर यांचे डाळिंब थेट बांगला देशात निर्यात होत आहेत. येथील डाळिंब उत्तम असून, डाळिंब खरेदी करणारे अनेक व्यापारी याची मागणी करत आहेत. येथील डाळिंबाला आळेफाटा येथील बाजारात 194 रुपये किलोचा उच्चांकी भाव मिळाला. नगर-सोलापूर महामार्गालगत कर्जत तालुक्यात मांदळी जवळ थेरगाव गाव आहे. येथील रहिवासी आजीनाथ रायकर यांना पुरेशी शेती नव्हती. शेतीसाठी खडकाळ माळरान असलेली वडिलोपार्जित 20 एकर जमीन निवडली. या जमीनीतून हमखास उत्पन्न काढण्याचा माणस विवेक रायकर यांनी केला. 20 एकर श्रेत्रावर डाळिंब लागवड केली. लागवड करताना भगवा डाळिंब या वाणाची निवड केली. लागवडीसाठी दोन टप्पे करण्यात आले. पाणी उपलब्ध नाही म्हणून सीना नदीवरून पाईपलाईन केली. ठिबक सिंचनाद्वारे संपूर्ण बागेला पाणी पुरवठा केला जातो. बागेसाठी गांडूळ खत तयार केले जाते. शिवाय बागेत कधीही तणनाशकाची फवारणी केली जात नाही. लहान मुलांप्रमाणे बागेची काळजी घेतली जाते. यामुळे डाळिंबावर रासायनिक औषधांची फवारणी कमी प्रमाणात करावी लागते. या बागेत गेल्या चार-पाच वर्षांपासून डाळिंबाचे उत्पादन सुरू झाले आहे. पूर्वी हे प्रमाण कमी होते; परंतु यावर्षी 10 एकर क्षेत्रातून सुमारे 200 टन उत्पादन होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या येथील डाळिंब बागेत फळांची तोडणी सुरू असून, यावर्षी आळेफाटा येथे हा माल दिला. डाळिंबाचा आकार, कलर व गोडी पाहून हा माल आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करण्यासाठी पात्र ठरला आहे. तो सध्या बांगला देशाला पाठविला जात असून, कर्जत तालुक्याला दुष्काळी संबोधले जाते. परंतु, अलिकडीच्या काळात उपलब्ध पाणी येथील प्रगतशील शेतकर्यांनी केलेली शेतीमुळे येथील उत्पादन परदेशात जाऊ लागले आहे. ही अभिमानाची बाब आहे. गेली चार-पाच वर्षांपासून डाळिंब विक्री करत आहे. मुंबई, पुण्यापेक्षा आळेफाटा येथे सर्वाधिक भाव मिळाला. शिवाय येथे कोणतीही आर्थिक जोखीम नाही. अनेक डाळिंब उत्पादक शेतकर्यांना फसवणुकीचे प्रकार आपण पहातो. येथे तसा काही प्रकार होत नाही. डाळिंब उत्पादक शेतकर्यांना माल विक्री करण्यासाठी आळेफाटा उत्तम ठिकाण आहे. -विवेक रायकर, डाळिंब उत्पादक शेतकरी, थेरगाव थेरगावचे प्रगतशील शेतकरी विवेक रायकर यांच्या नगर- सोलापूर महामार्गालगत ही बाग आहे. डाळिंब बागेतील फळांचा दर्जा पहाता याला 194 रुपये प्रति किलो दर मिळाला. हा आता पयर्र्ंतचा उच्चांकी भाव आहे. यामुळे आजच्या पदवीधर युवकांनी शेती केली तर काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. – दत्तात्रय ननवरे, व्यवस्थापक डाळिंब बाग, थेरगाव The post कौतुकास्पद ! पदवीधर युवकाने खडकाळ माळरानावर फुलविली डाळिंब बाग appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sw7JWB
0 Comments: