“संजय राऊत हे शरद पवारांच्या आदेशानुसार…”; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गंभीर आरोप
राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरुन शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे शिवसेना पक्ष संपव असल्याचा आरोप केलाय. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध बंडखोर आमदार अशी न्यायलायीन लढाई सुरु असतानाच बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असणाऱ्या राऊत यांना लक्ष्य केलं आहे.
नक्की वाचा >> “शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा, गुवाहाटीतील हॉटेलमधून…”; नारायण राणेंना आठवली ठाकरे सरकारने केलेली अटकेची कारवाई
बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमदांरांच्यावतीने बोलताना संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहे. “संजय राऊत हे शरद पवारांच्या आदेशानुसार पक्ष (शिवसेना) संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळ्या चालवतील,” असं केसकर यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे आता दोन नाही तीन खात्यांचे मंत्री; उद्धव ठाकरेंनी सोपवली नवीन जबाबदारी
मात्र पुढे बोलताना केसकर यांनी बंडखोर आमदार संघर्ष सुरु ठेवणार असल्याचंही नमूद केलंय. “आम्ही संपणार नाही. आम्ही थांबणार नाही. आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत आम्ही महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेवून ठेवत नाही,” असं केसकर यांनी म्हटल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलंय.

अन्य एका मुलाखतीमध्येही केसकर यांनी राऊतांवर कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर खालच्या भाषेत टीका करताना आमदारांनी मुंबईत येऊन दाखवावे असे आव्हान दिले आहे. त्यानंतर गुवाहाटी येथे मुक्कामी असलेले बंडखोर आमदार देखील संतापले आहेत. बंडखोर आमदारांच्यावतीने बोलताना दीपक केसरकर यांनी राऊतांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलंच सुनावलं आहे. “मी आतापर्यंत शांत राहिलो. संजय राऊतांना आम्हीच मतं दिली. अगोदर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि नंतर ही वक्तव्ये करावी. ही वक्तव्ये कोण सहन करणार आहे?” असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केलाय.
नक्की वाचा >> उद्धव यांच्या परवानगीशिवाय एकनाथ शिंदेंनी तेव्हा घेतलेली राज ठाकरेंची भेट; भेटीत म्हणालेले, “खरं तर आम्ही तुमच्यासोबतच…”
“आम्ही एकाच बापाचे आहोत, जे गेले ते अनेक बापाचे आहेत, असं संजय राऊत म्हणाले होते. महाराष्ट्राने महिलांना नेहमी सन्मान दिलेला आहे. कल्याणच्या सुभेदराचा पराभव केल्यानंतर छत्रपती शिवजी महाराजांनी त्यांच्या पत्नीला आईची उपमा दिली होती. त्यात शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणाऱ्या शिवसेनेमध्ये अशा तऱ्हेचा प्रवक्ता पक्षप्रमुखांना चालतो का. मी आतापर्यंत शांत राहिलो. या वक्तव्यातून काय अर्थ निघतो. त्यांना निवडून दिलं. आम्हीच मतं दिली तेव्हाच ते राज्यसभेत गेलेले आहेत. त्यांनी अगोदर राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि नंतर ही वक्तव्ये करावी. ही वक्तव्ये कोण सहन करणार आहे?” अशी परखड भूमिका केसरकर यांनी घेतली.
नक्की वाचा >> शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना फोन करुन सांगतायत…; मुंबईच्या माजी महापौरांचा मोठा दावा
तसेच, “एखाद्याने आमच्या कुटुंबाबद्दल बोलावं हा अधिकार राऊतांना कोणी दिला? आम्हाला शिवसेनेचं नाव असेल, त्यासोबतच आमची व्यक्तिगत मतंदेखील आहेत. कोकणात विजय मिळवायचा ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यासाठी माझं किती मोठं काम आहे हे सर्वांनाचा माहिती आहे. राऊतांकडून आम्ही असं ऐकायचं आहे का?” असा सवाल केसरकर यांनी केला.
https://ift.tt/0gGN47x
0 Comments: