चक्क सलमान खानने साबरमती आश्रमात जाऊन चालवला बापूंचा चरखा; नंतर म्हणाला…

‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांनी गुजरात दौरा केला आहे. अहमदाबादला आलेल्या सलमानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सलमानने महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी सलमानने चक्क बापूंचा चरखाही चालवला.
सलमान केवळ 10 ते 15 मिनिटे साबरमती नदीच्या काठावरील ‘साबरमती’ आश्रमात थांबला होता. या ऐतिहासिक ठिकाणी वसलेले महात्मा गांधीजींचे निवासस्थान असलेले ‘हृदय कुंज’लाही त्याने यावेळी भेट दिली. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आश्रमाला भेट देऊन निघताना सलमानने व्हिजिटर बुकमध्ये आपला अभिप्राय लिहिला. ‘मला इथे यायला खूप आवडले आणि हा आनंद मी कधीच विसरणार नाही. मला पहिल्यांदाच अशा ठिकाणी फिरायला मिळाले आहे. मला या आश्रमात पुन्हा यायला आवडेल, असे त्याने म्हटले आहे.
त्याने हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. ती याठिकाणी येणार ही बातमी समजताच त्याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. याठिकाणी व्हरांड्यात बसून त्याने चरख्यावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला.
याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुखांनी सूत कातले आहे. आश्रमाने त्यांच्या परंपरेनुसार सलमानचे स्वागत करताना कापसाचा हार घालण्यात आला. यामुळे सलमान खान भारावून गेला.
सलमानने देखील त्यांच्या खास शैलीत तो हार हाताला गुंडाळला. तसेच त्याने चाहत्यांना देखील बघत हात उंचावला. यामुळे त्याचे चाहते देखील खुश झाले. आता सगळ्यांना या त्याच्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: