‘आता तरी मुलांना नीट सांभाळा..’ आर्यनच्या सुटकेनंतर शाहरूखला सहकलाकाराचा परखड सल्ला

मुंबई। बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवरील ड्रग्स पार्टीत ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आली. मात्र शाहरुखने केलेल्या अथक प्रयत्नानंतर अखेर 26 दिवसानंतर जामीन मिळाला आहे. ड्रग्स केस प्रकरणी 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने ताब्यात घेतलं होतं.
अखेर 26 दिवसांनंतर आर्यन जेलमधून बाहेर आला आहे. आर्यन बाहेर आल्यामुळे शाहरुख, गौरी आणि त्यांचे चाहते आनंदी आहे. ज्यावेळी आर्यनला अटक करण्यात आली त्यावेळी अनेक बॉलीवूड कलाकारांनी आर्यन आणि शाहरूखला सपोर्ट केला.
मात्र यापैकीच बऱ्याचशा कलाकारांनी या काळात शाहरुख आर्यनवर निशाणा साधल्याचेही पाहायला मिळाले आहे. दरम्यान शाहरुखचा सहकलाकार अभिनेता पियुष मिश्रा याने शाहरुखच्या सहकलाकाराने त्याला आता तरी मुलांना सांभाळ… असा सल्ला दिला आहे.
अभिनेता पियुष मिश्राने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखला सल्ला दिला आहे. पियुष म्हणाला, ‘माझ्या प्रतिक्रिया काय असेल? त्याने केलं… त्याला बेल मिळाली… बाहेर तो आला… आता याबद्दल शाहरुख आणि त्याचा मुलगा बघून घेईल… समीर वानखेडे बघून घेतील… जे काही आहे ते ठीक आहे..तुम्ही जे केलंय त्याची फळ भोगावीच लागणार… फक्त तुझ्या मुलांना नीट सांभाळ…’ पियुषचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
सांगायचं झालं तर, पियुष शर्मा आणि शाहरुखने 1998 साली ‘दिल से’ चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. चित्रपटात पियुषने सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. आर्यनच्या जामिनानंतर सेलेब्सनी आनंद व्यक्त केला आहे.
कोर्टाचा निकाल लागताच अभिनेता आर माधवनने एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याने देवाचे आभार मानले. त्याचवेळी स्वरा भास्करनेही ट्विटमध्ये ‘FINALLY’ लिहून आनंद व्यक्त केला आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला तात्काळ फोन करून अभिनंदन केले.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: