शेवटच्या क्षणी हसत डान्स करत असताना काळाची झडप, पुनीत राजकुमारचा व्हिडिओ व्हायरल

साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार याचं नुकतेच निधन झाले. २९ ऑक्टोबरला जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे त्याच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. त्याचे लाखो चाहते होते. ४६ व्या वर्षी पुनीतने या जगाचा निरोप घेतला. यामुळे कन्नड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
पुनीत राजकुमारने त्याच सकाळी ट्विट करून चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. ६ तासांपूर्वी त्याचे शेवटचे ट्विट पाहून, अभिनेता आता या जगात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पुनीतच्या निधनावर सर्व दिग्गज सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. अनेकांना यावर विश्वास बसत नव्हता.
सध्या पुनीतच्या चाहत्यांकडून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुनीतच्या मृत्यूच्या काही तास आधीचा आहे. या व्हिडीओमध्ये पुनीत सुपरस्टार यशसोबत डान्स करताना दिसत आहे. KGF स्टार यश आणि पुनीत राजकुमार यांचा एकत्र असलेला हा शेवटचा व्हिडीओ होता.
This was Puneeth Rajkumar's last public appearance, just 24 hours back!
Life is so uncertain! pic.twitter.com/5njlaGRkVc
— Mahesh Vikram Hegde
(@mvmeet) October 29, 2021
हा व्हिडिओ बघून अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. अनेकांना तो या जगात नाही, यावर विश्वास बसत नाही. पुनीतचा हा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ काल रात्रीच्या ‘बजरंगी 2 ‘च्या प्रमोशन इव्हेंटचा आहे.
या कार्यक्रमात पुनीत राजकुमार ‘KGF-2’ स्टार यशसोबत स्टेजवर मस्ती करताना आणि नाचताना दिसत आहे. काल जेव्हा हा व्हिडीओ काढला गेला तेव्हा कोणीही असा विचार केला नसावा की, हा हसता खेळता चेहरा असा अचानक काळाच्या पडद्याआड जाईल.
अनेकांनी त्याच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. अभिनेता सोनू सूदने लिहिले, ‘हृदयभंग. भाऊ तुझी नेहमी आठवण येईल. तसेच क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागसह सर्व सेलिब्रिटींनी ट्विट करून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: