आर्यनविरोधात व्हाट्सएप चॅटसारखा मोठा पुरावा असतानाही एनसीबीचा युक्तिवाद कुठे कमी पडला?

गेल्या एक महिन्यापासून राज्यभरात ड्रग्स क्रूझ प्रकरणाची जोरदार चारचा होती. या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. २६ दिवसांपासून तो जेलमध्ये होता, अखेर त्याचा जामीन न्यायलायने मंजूर केला आहे.
आर्यन खानसोबतच मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी होत होती, पण अखेर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे.
या सुनावणी दरम्यान एनसीबीकडून अनेक युक्तिवाद मांडण्यात आले होते. आर्यन खान ड्रग्स डीलर असून त्याला जामीन दिली तर तो त्याच्याविरोधातले सर्व पुरावे नष्ट करेल असाही युक्तिवाद एनसीबीने मांडला होता. विविध मुद्यांना अनुसरून दोन्ही पक्षांनी युक्तिवाद मांडला होता. पण गुरुवारी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत आर्यन खानचा जामीन मंजूर केला आहे.
जेव्हा आर्यन खानची एनसीबी चौकशी करत होती, तेव्हा त्यांनी आर्यन खानचा फोन जप्त केला होता. त्यामध्ये त्यांना व्हाट्सएप चॅट मिळाल्या होत्या. एनसीबीकडे आर्यन विरोधात हा मोठा पुरावा होता, त्यामुळे त्याला जामीन कसा मिळाला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
आर्यन आणि अरबाजच्या वकिलांनी व्हाट्सएप चॅटवरही युक्तिवाद केला आहे. यावर आर्यन खान आणि अरबाजच्या वकिलांनी हे चॅट जुनं असल्याचे म्हटले आहे. या चॅटवरून ते कोणताही मोठा प्लॅन करत आहे, असा संदर्भ लागत नाही, असा युक्तिवाद वकिलांनी मांडला होता.
एका चॅटचा दुसऱ्या चॅटशी काही संबंध नाही. आजची तरुणाई हे शब्द शॉट्स फॉर्ममध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतात. ड्रग्सशी संबंधित शब्द ते कधी कधी वापरतात, त्यामुळे असा गौरसमज होऊ शकतो असेही वकिलांनी म्हटले आहे.
तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे घ्यायचे असतील, तर त्यासाठी एनसीबीकडे त्यासाठीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. पण एनसीबीकडे ते प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळाला पाहिजे असे आर्यनच्या वकिलांनी म्हटले होते. हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करत त्याचा जामीन मंजूर केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
भररस्त्यात दोन तरुणी भिडल्या, फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ व्हायरल; कारण ऐकून धक्का बसेल
महिलेने आपल्याच बॉयफ्रेंडला जीवंत जाळले, कारण ऐकून पोलिसही हादरले
दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं नवीन गाणे; एकदा झलक पहाच
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: