समीर वानखेडेंसाठी मनसे उतरली मैदानात, जाहीर पाठींबा देत म्हणाले…

मुंबई | 3 ऑक्टोबरला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाली. या प्रकरणामुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत होते. त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून एनसीबीच्या कारवाईचे समर्थन केले जात आहे. समिर वानखेडेंवर, त्यांच्या कुटुंबावर, जातीवर हल्ले होत आहेत. अनेक लोकांनी देखील समीर वानखेडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. यातच आता मनसेने देखील समीर वानखेडे यांना पाठिंबा दर्शवत सूचक ट्विट केले आहे. अमेय खोपकर, संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीने शुक्रवारी वानखेडे स्टेडियवर लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाचा फोटो शेअर करत मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी ‘वानखेडेला शुभेच्छा’ असे सूचक ट्विट केले आहे.
"वानखेडे"ला शुभेच्छा!! pic.twitter.com/PNSa2PvnyM
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 30, 2021
यानंतर मनसेचा समीर वानखेडे यांना पाठिंबा असल्याच्या चर्चा होत आहे. याआधी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर यांच्या पाठिशी उभी राहणार असल्याचे म्हंटले होते.
"वानखेडे"ला शुभेच्छा!! pic.twitter.com/NvJdLSLeH6
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 30, 2021
समीर वानखेडे आणि त्यांची बहीण आणि मनसेच्या पदाधिकारी असलेल्या जास्मिन वानखेडे यांचा मनसेने बचाव केला होता. तसेच जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा अभिमान आहे, असे मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले होते. तदनंतर वानखेडेंबाबत मनसेने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेय खोपकर यांनी क्रांती रेडकर ला सुद्धा पाठिंबा दिला होता. ते म्हणाले होते की, गरज भासल्यास क्रांती रेडकर यांच्या पाठिशी मनसे उभी राहिल. एकीकडे बॉलिवूडमधील कलाकार शाहरूख खानला पाठिंबा दर्शवत होते पण एनसीबीच्या बाजूने कोणीच उभे राहत न्हवते तेव्हा मनसेने क्रांती रेडकर यांना पाठिंबा दर्शवला आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: